CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 04:19 PM2020-07-03T16:19:04+5:302020-07-03T16:45:24+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची अधिक शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सर्वाधिक धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे.

जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांचा आकडा हा एक कोटीच्या वर गेली आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी संशोधन केलं जात असून नवनवीन माहिती समोर येत आहे.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सर्वाधिक धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये धूम्रपानाची सवय असलेल्यांची संख्या जास्त असल्याचं समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धूम्रपान आणि कोरोना यांच्याशी निगडीत 34 संशोधनाचा अभ्यास केला आहे.

धूम्रपानाची सवय असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा धोका सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. या तुलनेत इतर लोकांच्या मृत्यूची संख्या कमी आहे.

धूम्रपानामुळे फुफ्फुसावर अधिक परिणाम होतो. त्यामुळे हे व्यसन असणाऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता ही इतर रुग्णांच्या तुलनेत जास्त असते.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी धूम्रपान करणाऱ्या रुग्णांची संख्या ही 18 टक्के आहे. धूम्रपान आणि कोरोनाचा संबंध असून त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

रिसर्च रिपोर्टनुसार धूम्रपान करत असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर वाचण्याची शक्यता खूप कमी असते. धूम्रपान करत असलेल्या व्यक्तीच्या शरीराला कोरोना जलद गतीने नुकसान पोहोचवतो.

जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 524,188 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक कोटीहून अधिक लोकांना कोरोचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 10,992,462 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 6,152,481 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी इमारती, हॉटेल्स यांचं रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.