शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : हँड सॅनिटायझरचा जास्त वापर करता?; वेळीच व्हा सावध, आरोग्य मंत्रालयाने दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 8:26 AM

1 / 15
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 14 लाखांच्याही पुढे गेली आहे. नव्या आकडेवारी प्रमाणे देशात आतापर्यंत तब्बल 14 लाख 11 हजार 954 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
2 / 15
covid19india.orgच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 4 लाख 77 हजार 228 सक्रिय रुग्ण आहेत. 9 लाख 1 हजार 959 जणांना रुग्णालयातून जिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 32 हजार 350 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
3 / 15
सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईन, होम आयसोलेशच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
4 / 15
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळया माध्यमातून जनजागृती केली जाते. यापासून बचावाचा मार्ग म्हणजे सतत आपले हात धुणे आणि मास्कचा वापर करणे.
5 / 15
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळेच साबणाने हात धुण्यापेक्षा लोक हँड सॅनिटायझरचाच जास्त वापर करत आहेत.
6 / 15
हँड सॅनिटायझरचा जास्त वापर करत असाल तर ते धोकादायक ठरत असल्याची माहिती आता समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयानेच याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
7 / 15
हँड सॅनिटायझर वारंवार वापरल्याने त्वचेला नुकसान होऊ शकतं, त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात असं याआधी अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारनेही याबाबत लोकांना सावध केलं आहे.
8 / 15
हँड सॅनिटायझरचा जास्त वापर हानिकारक ठरू शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. आर. के वर्मा यांनी माहिती दिली आहे.
9 / 15
'एखाद्या व्हायरसचा इतका प्रकोप होईल याचा कोणीही विचारही केला नव्हता. स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा. गरम पाणी प्या आणि हात नीट धुवा, सॅनिटायझरचा जास्त वापर करू नका' असं वर्मा यांनी म्हटलं आहे.
10 / 15
सॅनिटाझरचा जास्त वापर केल्याने त्वचेवरील चांगल्या बॅक्टेरियांचाही नाश होऊ शकतो. साबण आणि पाणी असेल तर त्यानेच हात धुवा. साबण नसेल तेव्हाच सॅनिटायझरचा वापर करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
11 / 15
सॅनिटायझर घेताना कोणती काळजी घ्यावी यासंबंधी फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) ने महत्त्वाची माहिती दिली आहे. नागरिकांना मोलाचा सल्ला दिला आहे.
12 / 15
कोरोनापासून बचाव करण्यासाठी चांगल्या आणि प्रभावी हँड सॅनिटायझरमध्ये 70 ते 80 टक्के अल्कोहल असणं गरजेचं आहे. त्वचेला इजा होईल असं कोणतंही केमिकल नसावं.
13 / 15
हँड सॅनिटायझरमध्ये 60 ते 95 टक्के अल्कोहोल असल्यानं हँड सॅनिटायझर प्रभावी असतात. तेव्हाच ते जंतू आणि कोरोनासारख्या व्हायरसचा नाश करू शकतात.
14 / 15
व्हायरसचा खात्मा करण्यासोबतच हाताची त्वचा उत्तम ठेवण्याचं काम सॅनिटायझरने करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याची खरेदी करताना त्यात कोणते घटक आहे हे एकदा नक्की तपासा.
15 / 15
व्हायरसचा खात्मा करण्यासोबतच हाताची त्वचा उत्तम ठेवण्याचं काम सॅनिटायझरने करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याची खरेदी करताना त्यात कोणते घटक आहे हे एकदा नक्की तपासा.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सIndiaभारत