CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनाचा नवा स्ट्रेन थेट डोळे आणि कानावर करतोय अटॅक; पाहण्याची, ऐकण्याची क्षमता होतेय कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 01:07 PM2021-04-15T13:07:11+5:302021-04-15T13:19:55+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाची आणखी दोन नवीन लक्षणं आता समोर आली आहेत. रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती मिळत आहे.

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या तब्बल 13 कोटींवर पोहोचली आहे. अनेक देशात परिस्थिती गंभीर झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

अमेरिकेसारखा प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल एक कोटीच्यावर गेला आहे.

देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाची आणखी दोन नवीन लक्षणं आता समोर आली आहेत. रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती मिळत आहे.

कोरोनाचा नवा स्ट्रेन हा आता थेट डोळे आणि कानावर अटॅक करत आहे. त्यामुळेच पाहण्याची, ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचा धक्कादायक खुलासा संशोधनातून करण्यात आला आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमणाचा थेट परिणाम हा कान आणि डोळ्यांवर होत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन मुख्य लक्षण असणाऱ्या तापाबरोबरच डायरिया, पोटदुखी, उलटी होणे, अपचन यांसारखी लक्षण दाखवत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नवनवीन लक्षणं समोर येत आहेत. एसजीपीजीआई (SGPGI) आणि केजीएमयू (KGMU) सह अनेक कोरोना रुग्णालयात भरती असणाऱ्या रुग्णांना ऐकण्याची आणि दिसण्याची समस्या येते आहे.

रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयात भरती असलेल्या अनेक रुग्णांना दिसण्याची आणि ऐकण्याची समस्या येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच तज्ज्ञांच्या मते असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांना दोन्ही कानाने ऐकू येत नाही. तर काही कोरोना रुग्णांनी दिसत नसल्याची तक्रार देखील केली आहे.

डॉक्टरांनी रुग्णांची अवस्था गंभीर असल्यामुळे त्यांच्या शरिरातील इतर अवयव यामुळे प्रभावित होत आहेत. अशावेळी डोळे आणि कानांवर देखील परिणाम होत आहे असं म्हटलं आहे. कोरोनाने त्याचं रूप बदललं आहे त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.

कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. हाच एकमात्र उपाय असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान नवीन स्ट्रेन चिंताजनक असला तरी डॉक्टरांनी एक दिलासादायक बाब देखील नमूद केली आहे.

जर रुग्णामध्ये प्रतिकारक्षमता व्यवस्थित असेल तर हा स्ट्रेन संबंधित रुग्णाला अधिक त्रास देणार नाही, तर 5 ते 6 दिवसात रुग्ण ठीक होऊ शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी (15 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,00,739 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,038 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,40,74,564 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 73 हजारांवर पोहोचला आहे.

कोरोनाच्या संकटात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानाच्या जोधपूरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. परिस्थिती इतकी भयावह आहे की, दर दोन मिनिटाला एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सीएमएचओच्या रिपोर्टनुसार, शहरात 770 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शिवाय चार कोरोना रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

जोधपूर आयआयटीमध्ये 74 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता जोधपूर शहरातील राजपुरोहित समाजाच्या वसतिगृहामध्येही कोरोना विस्फोट झाला आहे.

कुंभमेळा हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे.