Coronavirus : कधी करावा CT स्कॅन? बघा कोरोना फुप्फुसावर कसा करतो प्रभाव!

Published: May 8, 2021 12:10 PM2021-05-08T12:10:55+5:302021-05-08T12:21:07+5:30

Coronavirus : कोरोना व्हायरस हा हवेतून पसरतो. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाच्या फुप्फुसावर तो हल्ला करतो. त्यामुळे रूग्णाला हळूहळू श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. कोरोना पीकवर कधी असणार आणि कधी संपणार, यावर चर्चा होत असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोना व्हायरस हा हवेतून पसरतो. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाच्या फुप्फुसावर तो हल्ला करतो. त्यामुळे रूग्णाला हळूहळू श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

कोरोना आपल्या फुप्फुसांवर कशाप्रकारे हल्ला करतो यावर नवी दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलचे चेस्ट डिजीज डिपार्टमेंटचे सीनिअर डॉक्टर बॉबी भालोत्रा यांनी विस्ताराने माहिती दिली आहे.

डॉक्टर बॉबी भालोत्रा म्हणाले की, कोरोना व्हायरस एक व्हायरस इन्फेक्शन आहे. जे रूग्णाचा जीव घेऊ शकतं. याला आळा फक्त नियमांचं पालन करून आणि वॅक्सीनेशननेच घातला जाऊ शकतो. या दोन उपायांनीच यापासून बचाव केला जाऊ शकतो. त्यामुळे हे समजून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं आहे.

कोरोना व्हायरस इन्फेक्शन सर्वातआधी नाक आणि नंतर गळ्याला इन्फेक्ट करतं. जर तुमची इम्यूनिटी याला नाक आणि गळ्यापर्यंत रोखू शकत नसेल तर तो लंग्समध्ये प्रवेश करून एकप्रकारे निमोनिया करतो.

डॉक्टर बॉबी भालोत्रा म्हणाले की, सीटी स्कॅन एक असं इन्वेस्टीगेशन आहे, ज्यातून आपल्या लंग्समध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव चांगल्या प्रकारे बघायला मिळतो.

कोरोना व्हायरसमुळे लंग्समध्ये पांढरे डाग येतात. रूग्णाच्या फुप्फुसात निमोनियाचे निशाण बघायला मिळतात. हे निशाण कुणात कमी तर कुणात जास्त बघायला मिळतात.

काही रूग्णांमध्ये फुप्फुसांवरील हे डाग इतके वाढतात की, फुप्फुसात हवा जाण्याचे मर्ग ब्लॉक होतात. त्यामुळे रूग्णाला जास्त ऑक्सीजनची गरज पडते. अनेकदा रूग्णांना व्हेंटीलेटरवरही टाकावं लागतं.

या फोटोत एक्स-रे ला वेगळ्या प्रकारे बघितलं गेलं आहे. ज्यात कोरोना व्हायरसच्या जखमा पूर्णपणे दिसत आहेत. सीटी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये उजव्या आणि डाव्या साइडच्या फुप्फुसांना वेगवेगळ्या भागात विभागलं जातं आणि नंबरची स्कोरिंग दिली जाते.

स्कोर पाच असेल तर याला माइल्ड मानलं जातं आणि तोच जर २० च्या वर असेल तर स्थिती गंभीर आहे. अशाप्रकारे सीटी स्कॅनच्या माध्यमातून कोरोना व्हायरसमुळे या आजाराची माहिती कमीत कमी पाच ते सात दिवसानंतर मिळते. अनेक असे आजार आहेत जे कोरोना व्हायरससारखे लंग्समध्ये झालेलं इन्फेक्शन समजतं.

आज सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, कुणी सीटी स्कॅन करावा आणि कुणी करू नये? जर प्रत्येक व्यक्ती सीटी स्कॅन करायला गेली तर योग्य होणार नाही. कारण सीटी स्कॅनमुळे वाटतात. त्यामुळे RTPCR महत्वाची आहे. कोरोना व्हायरसची माहितीसाठी डॉक्टरच्या सल्ल्यानंतरची सीटी स्कॅन करावा. जर कुणाला लंग्सची लक्षणे आहेत किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर रूग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने सीटी स्कॅन करावा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!