कोरोनाशी लढण्यासाठी भारतीय कंपन्यांचं मोठं पाऊल; आयुर्वेदिक औषधांची चाचणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:58 PM2020-06-09T14:58:47+5:302020-06-09T15:14:52+5:30

कोरोनाच्या माहामारीचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी जगभरातीस शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांचे उपचार केले जात आहे. अशात एक आशेचा किरण दाखवणारी माहिती समोर येत आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी इम्यूनिटी बुस्टर थेरेपीचा वापर करून पारंपारिक औषधांवर परिक्षण केलं जात आहे.

त्यात आयुर्वेदिक आणि होम्‍योपॅथी औषधं तयार करत असलेल्या २० पेक्षा जास्त कंपन्यांचा समावेश आहे. आयुष मंत्रालयाने अश्‍वगंधा, यष्टिमधु, गुड़चि आणि पिप्‍पली यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पतींसह पॉली हर्बल फॉर्म्‍युलेशन (Aayush-64) विकसीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारं औषध तयार करण्यासाठी हमदर्द लॅबोरेट्रीज, डाबर, श्री श्री तत्‍व यांसारख्या कंपन्यांची चाचणी सुरू आहे. या कंपन्यांनी चाचणीसाठी नोंदणी सुद्धा केली आहे.

हमदर्द लॅबोरेट्रीजने आयुर्वेदिक पद्धतीने रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असेलल्या उत्पादनांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. वैद्यकिय चाचणीसाठी लक्षणं दिसत नसलेल्या तसंच कमी प्रमाणात संक्रमण झालेल्या कोरोना रुग्णांवर परिक्षण केले जाणार आहे. या परिक्षणाचे परिणाम दोन महिन्यांनंतर दिसून येतील.

अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांची आयुर्वेदिक कंपनी श्री श्री तत्‍व ने बँगलोर मेडिकल कॉलेज एंड रिसर्च इंस्‍टीट्यूटसोबत कोरोनाशी लढण्यासाठी काम करण्यास सुरूवात केली आहे. यात लक्षण दिसत नसलेल्या ५० कोरोना रुग्णांवर इम्‍युनिटी बूस्टिंग फॉर्म्‍युलेशंसची चाचणी केली जाणार आहे.

तसंच डाबर कंपनीच्या व्यवनप्राशने कोविड १९ च्या संक्रमणाची तीव्रता कमी करता येऊ शकते का याबाबत कंपनीचे संशोधन सुरू आहे.

या व्यतिरिक्त भारतीय पारंपारिक औषधी वनस्पतींवर संशोधन सुरू आहे. या कंपनींनी सुरू केलेल्या वैद्यकिय परिक्षणाला आयुष मंत्रालय, CSIR, तांत्रिकदृष्या (ICMR)चा पाठिंबा आहे.