Corona virus : कोरोनाच्या जाळ्यात अकडण्याआधी रोगप्रतिकारकशक्तीचे 'हे' संकेत माहीत करून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 09:29 AM2020-04-05T09:29:55+5:302020-04-05T10:07:01+5:30

सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण तयार झालं आहे. अशात कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. अन्यथा अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. आत्तापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू कोरोनाच्या संक्रमणामुळे झाला आहे. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे की नाही हे कसं ओळखायचं याबाबत सांगणार आहोत.

रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे की योग्य आहे. याचा अंदाज तुम्हाला आल्यानंतर त्यासाठी आहार घेण्यापासून तसंच याचं प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही आरोग्याकडे लक्ष देऊ शकता.

सर्दी, खोकला सतत होणं- ही समान्य समस्या असली तरी तुम्हाला सतत याचा सामना करावा लागत असेल तर तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे. सर्दी झाल्यानंतर एका आठवड्यापेक्षा त्रास होत असेल तर रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे.

सतत इन्फेक्शन होणं- त्वचेचं, फुप्फुसांचं, अशा इन्फेक्शनचे लोक शिकार असतात. हे आपली इम्युनिटी कमी असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शरीरातील व्हायरस आणि बॅक्टेरिया रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर लगेच अटॅक करून शारीरिक संतुलन बिघडवतात. याऊलट रोगप्रतिकराकशक्ती चांगली असेल तर आजारांशी लढण्यास मदत होते.

लिम्फ नोड्समध्ये सूज- शरीरात असलेले लिम्फ नोड्स व्हाईट ब्लड सेल्सना फिल्टर करत असतात. त्यांना लिम्फोसाईट्स असं म्हणतात. शरीरातील व्हाईट ब्लड सेल्स कमी झाले तर इन्फेक्शनचा सामना करू शकत नाही. त्यामुळे लिम्फ नोड्समध्ये सुज येणं रोगप्रतिकराकशक्ती कमजोर असल्याचं लक्षण आहे.

जखम बरी होण्यास जास्त वेळ लागणं- रोजच्या जीवनात अनेकदा हातापायाला लागतं किंवा शरीरातील अन्य भागांवर जखमा होतात. पण रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर जखम बरी व्हायला बराच वेळ लागतो. हे रोगप्रतिराकशक्ती कमी असण्याचं लक्षण आहे.

नेहमी थकवा येणं- पोटभर खाल्यानंतर किंवा ७ ते ८ तास झोपल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला थकवा आल्यासारखं वाटत असेल तर तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी असण्याचं लक्षण आहे, त्यामुळे शरीरातील फंक्शन्स व्यवस्थित कार्यरत नसतात. म्हणून नेहमी थकवा येतो. जास्त थकवा येणं थायरॉइड, एनीमिया , डायबिटीस या आजाराचे संकेत सुद्धा असू शकतात. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती का कमी होते याची कारण सुद्धा माहीत असणं तितकचं गरजेचं आहे.

लठ्ठपणा - लठ्ठपणाचा संबंध डायट आणि एक्सरसाइजची कमतरता यांच्याशी आहे. याने इम्युनिटी कमजोर होते. लठ्ठपणामुळे अॅंटी-बॉडीजचं निर्माण होऊ शकत नाही आणि रक्तपेशींची संख्याही योग्य प्रमाणात वाढत नाही. ज्यामुळे लठ्ठ लोकांमध्ये संक्रमणापासून लढण्याची क्षमता कमी होते.

पुरेशी झोप न घेणे - पुरेशी झोप घेतल्याशिवाय इम्यून सिस्टम आजारांसोबत लढण्यासाठी क्षमता जमवू शकत नाही. इम्युनिटीशी संबंधित सर्वच प्रक्रियांचे संकेत मेंदुशी जुळलेले असतात आणि जर तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेतली नाही तर रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते. त्यामुळे रोज रात्री ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

एक्सरसाइज न करणे - नियमित एक्सरसाइज करणं चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. एक्सरसाइज न केल्याने शरीरातील आळश, मांसपेशींमधील तणाव आणि सांधेदुखीची समस्या होऊ लागतात. पुढे जाऊन याने आणखी गंभीर परिणाम दिसतात. रोगप्रतिकारकशक्तीही कमजोर होते. त्यामुळे नियमित एक्सरसाइज करणं गरजेचं आहे.

फळं आणि भाज्यांचं सेवन न करणे - इम्यून सिस्टमला योग्यप्रकारे काम करण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट्ससारखे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्सची गरज असते. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, फळं आणि भाज्यांमध्ये असे तत्व असतात ज्याने इम्यून सिस्टम मजबूत होतं.