ही आहेत फुफ्फुसं खराब होण्याची लक्षणं; कोरोना काळात घरगुती उपयांनी फुफ्फुसांना 'असं' ठेवा निरोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 06:10 PM2020-07-31T18:10:55+5:302020-07-31T18:38:08+5:30

कोरोनाकाळात जगताना शारीरिक समस्यांना दूर ठेवण्यासाठी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना विषाणू फुफ्फुसांसावर आक्रमण करतो. त्यामुळे श्वसनाचे आजार उद्भवतात. फुफ्फुसांच्या आजारात इतर समस्यांचाही समावेश आहे. न्यूमेथेरॅक्स ही स्थिती आहे. ज्यात फुफ्फुस आणि छातींच्या भीतींमधून हवा बाहेर येत असल्यामुळे फुफ्फुसांवर दबाब पडत असतो. त्यामुळे फ्फुफुसांचे नुकसान होते.

धुम्रपान करत असलेल्या लोकांना या आजाराचा जास्त धोका असतो. एक्स रे सीटी स्कॅनच्या माध्यामातून ही चाचणी केली जाते. न्यूमोथोरॅक्स उपचार न करताही ठीक होऊ शकते. काहीवेळा या आजारांच्या उपचारांसाठी थेरेपी दिली जाते.

अचानक छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, सुका खोकला, चक्कर येणं ही न्यूमेथेरॅक्स या आजाराची लक्षणं आहेत. छातीत जखम झाल्यामुळे, फुफ्फुसांमध्ये संक्रमण झाल्यामुळे तसंच फुफ्फुसांसंबंधी शस्त्रक्रिया केल्यानंतर ही समस्या उद्भवते.

आजारांची लागण होण्याआधी फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण काढण्यासाठी आम्ही तुम्हाला सोपा उपाय सांगणार आहोत. फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठी १ लीटर पाणी, ४०० ग्राम कापलेला कांदा, ५ चमचे मध, २ चमचे हळद आणि १ चमचा कापलेलं आलं या पदार्थांची आवश्यकता असणार आहे.

हा सोपा काढा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी पाणी गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यानंतर कांदा, आलं आणि हळद घालून मिक्स करा. कमी आचेवर पाणी उकळू द्या. पाणी उकळून अर्ध्यापेक्षा कमी झाल्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर यात मध घाला आणि एखाद्या भांड्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. हा काढा रोज सकाळी आणि संध्याकाळी २-२ चमचे प्या. जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर तुम्ही हे सिरप पिऊ शकता

या होममेड टॉनिकमध्ये आलं आणि कांदा आहे. त्या दोन्हींमध्ये एंटी-बॅक्टीरियल, एंटी-वायरल आणि एंटी-इंफ्लेमेट्री गुण असतात. त्यामुळे शरीरातील व्हायरस आणि बॅक्टेरियांपासून संरक्षण करता येतं.

या काढयातील पदार्थांमुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.फुफ्फुसांचे आरोग्य चांगलं राहून श्वसनाचे विकार उद्भवत नाहीत. ढ्याचे सेवन करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सिगारेट ओढणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं.

जर तुम्ही या काढ्याचे सेवन करत असाल तर धुम्रपानाची सवय सोडून द्या. जर कोणत्याही आजारावर तुमची वैद्यकीय ट्रिटमेंट सुरू असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या काढ्याचे सेवन करू नका.