कडू पण अत्यंत गुणकारी! कारलं पाहून नाक मुरडता?; 'हे' फायदे समजताच आवडीने खाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:18 PM 2024-08-08T16:18:19+5:30 2024-08-08T16:44:19+5:30
कडू असल्यामुळे फार कमी लोकांना कारलं खायला आवडतात. मात्र या कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत चवीला कडू असल्यामुळे फार कमी लोकांना कारलं खायला आवडतात. मात्र या कारल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारल्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर देखील असतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं हे खूप फायदेशीर आहे, याच्या सेवनाने पचनक्रियाही सुधारते. वजन कमी करणे आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. कारल्याचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया...
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, कारल्याचे रोज सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. कारल्यामध्ये आढळणारे विशेष गुणधर्म इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते.
हृदयविकाराचा कमी धोका कारलं हा हृदयाशी संबंधित समस्यांवर उत्तम उपाय आहे. खाल्ल्याने हार्ट अटॅक येण्याचा धोका देखील खूप कमी होतो.
कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि अनेक पोषक तत्व देखील असतात जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात.
रक्त शुद्ध करतं कारल्याच्या सेवनाने शरीरातील रक्तही शुद्ध होतं, ज्यामुळे रक्ताशी संबंधित अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
कारल्यामध्ये अल्फा-लिपोइक एसिड नावाचे औषधी गुणधर्म देखील असतात, जे रक्तातील चरबी कमी करण्यास आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात.
कॅन्सरचा कमी धोका कारल्यातील फ्लेव्होनॉइड्स, गार्डनिया आणि बीटा-कॅरोटीन सारखे केमिकल कम्पाऊंड कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. कॅन्सरशी लढण्यासाठी कारल्याचा रस सेवन करणे खूप फायदेशीर ठरते.
बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त कारलं केवळ मधुमेहच नाही तर बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. कारल्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.