गांजाने होऊ शकतो कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार, वैज्ञानिकांचा दावा!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 6, 2020 06:19 PM2020-10-06T18:19:09+5:302020-10-06T18:49:51+5:30

कोरोना व्हायरसच्या गंभीर रुग्णांवर गांजाच्या सहाय्याने उपचार केला जाऊ शकतो. एका नव्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी उंदरांवर गांजाचा प्रयोग करून तीन रिसर्च केले आहेत. मात्र, निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता आहे. तसेच, आम्ही लोकांना स्वतःहून गांजाचे सेवन करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही, असे केल्याने लोकांचा आजार वाढू शकतो, असेही संबंधित वैज्ञानिकांनी म्हटले आहे...

...मात्र, गांजामधील टीएचसीने (Tetrahydrocannabinol) कोरोना रुग्णांचा उपचार होऊ शकतो, असे अमेरिकेत करण्यात आलेल्या या संशोधनातून दिसून आले आहे.

खरे तर, टीएचसी धोकादायक इम्यून रिस्पॉन्सपासून लोकांचा बचाव करू शखते, यामुळे रुग्ण अनेकदा अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमला (ARDS) बळी पडतात.

डेली मेलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कोरोनाच्या गंभीर रुग्णांत ARDSची समस्या बर्‍यापैकी सामान्य असते. यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यूही होतो.

अमेरिकेतील या अभ्यासात सर्वप्रथम, टीएचसी इम्यून रिस्पॉन्सला आळा घालू शकतो का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अमेरिकेतील या युनिव्हर्सिटीच्या तीनही अभ्यासात काही डझन प्रयोग करण्यात आले.

सर्वप्रथम उंदरांना एक टॉक्सिन देण्यात आले आणि नंतर त्यातील काही उंदरांना टीएचसी देण्यात आले. यानंतर, ज्या उंदरांना टीएचसी देण्यात आले, ते वाचल्याचे आणि ज्या उंदरांना केवळ टॉक्सिनच देण्यात आले होते, त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

असे असले, तरी वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे, की या विषयावर आणखीही रिसर्च होण्याची आवश्यकता आहे. तसेच ते लोकांना गांजाच्या सेवनासाठी प्रोत्साहित करत नाहीत.

असे असले तरी, आता वैज्ञानिक गांजाचे मानवी परीक्षण करण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेतील काही राज्यांत गांजाच्या सेवनावर कायदेशीर बंदी आहे.