महिनाभर गोड खाणं सोडा, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 14:30 IST2018-05-03T14:30:16+5:302018-05-03T14:30:16+5:30

आहारात गोड पदार्थ खाण्याचं प्रमाण कमी केल्यानं मधुमेहाच्या समस्येपासून तुम्ही वाचू शकता.
जर तुम्हाला सांधे दुखीचा त्रास असेल तर गोड पदार्थ खाणं वर्ज्य करा, काही दिवसांतच तुम्हाला आपोआप फरक जाणवेल.
गोड पदार्थ खाणं कमी केल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. शिवाय, यामुळे मेंदू सक्रीय होतो आणि स्मरणशक्तीदेखील वाढते असे म्हटले जाते.
गोड खाल्ल्यानं झोपेवरदेखील परिणाम होतो.
गोड पदार्थ खाणं बंद केल्याचा चांगला परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. त्वचा उजळते आणि चेहऱ्यावरील मोठी छिद्रदेखील बंद होतात.