By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:38 IST
1 / 5डोळ्यांची आग होत असेल तर हे करा : डोळ्यांत जळजळ होत असल्यास थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत. डोळ्यांना विश्रांती देणे आणि मोबाइल, संगणकाचा वापर कमी करणे फायदेशीर ठरते.2 / 5उन्हात निघताना गॉगल्सचा वापर करा : सनग्लासेस (गॉगल्स) वापरल्याने सूर्याच्या तीव्र किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होते. धूळ आणि गरम वाऱ्याचा त्रासही कमी होतो. मात्र, सनग्लासेस वापरताना ते दर्जेदार असणे महत्त्वाचे आहे.3 / 5उन्हात बाहेर पडणे टाळा : दुपारी ११ ते ४ या वेळेत सूर्याची तीव्रता अधिक असते. शक्यतो या वेळेत बाहेर पडणे टाळावे. बाहेर जाणे आवश्यक असल्यास सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा.4 / 5वेळोवेळी डोळे पाण्याने धुवा : डोळ्यांमध्ये साचलेली धूळ आणि घाण काढण्यासाठी वेळोवेळी स्वच्छ पाण्याने डोळे धुणे आवश्यक आहे. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.5 / 5झोप पूर्णवेळ घ्या : उन्हाळ्यात शरीरासोबत डोळ्यांनाही पुरेशी विश्रांती मिळणे गरजेचे असते. दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घेतल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो. अपुरी झोप असल्यास डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा आणि लालसरपणा वाढू शकतो. शक्यतो दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळा, डोळ्यांची सातत्याने उघड झाप करत राहणेही महत्त्वाचे आहे.