रात्री-अपरात्री अचानक जाग येते का?; पुन्हा शांत झोप लागण्यासाठी ८ उपयुक्त टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 12:02 PM2021-02-27T12:02:52+5:302021-02-27T12:14:15+5:30

Sleeping Problem : अनेकांना वेगवेगळ्या चिंता असतात. नोकरीचं टेंशन, व्यवसायाचं टेंशन, घरातील काही अडचणींचं टेंशन या सर्व गोष्टींचा सतत विचार करीत राहिल्याने अनेकांना झोप येत नाही किंवा ते अर्ध्या झोपेतून जागे होतात.

चांगली आणि पुरेशी झोप ही आरोग्यासाठी किती महत्वाची आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण काही लोकांना झोप न येण्याची किंवा झोपेतून लगेच जाग येण्याची समस्या असते. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. ज्यांना ही समस्या असते ते प्रयत्न करूनही झोपू शकत नाहीत. पण अशावेळी काही खास टिप्स तुमच्या कामात पडू शकतात.

अनेकांना वेगवेगळ्या चिंता असतात. नोकरीचं टेंशन, व्यवसायाचं टेंशन, घरातील काही अडचणींचं टेंशन या सर्व गोष्टींचा सतत विचार करीत राहिल्याने अनेकांना झोप येत नाही किंवा ते अर्ध्या झोपेतून जागे होतात. मात्र, चिंता करण्याची गरज नाही. काही एक्सपर्ट्सनी सांगितलेल्या खास टिप्स तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी फायदेशीर ठरतील.

दीर्घ श्वास घ्या - दीर्घ श्वास घेणे ही चिंता, टेंशन दूर करण्याची सर्वात चांगली मेथड आहे. याने शरीराला चांगला आराम मिळतो. पण ती योग्य पद्धतीने केली तरच फायदा होईल. आधी पोटावर हात ठेवा. डोळे बंद करा आणि हळूवार नाकाद्वारे मोठा श्वास घ्या. १ ते ६ पर्यंत मोजत हा श्वास घ्या. नंतर श्वास तेवढेच आकडे मोजून तोंडाद्वारे सोडा. यूनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न कॅलिफोर्नियामधील असिस्टंट प्रोफेसर डॉ. राज दासगुप्ता सांगतात की, 'हळूवार दीर्घ श्वास घेणे आणि तोंडाव्दारे सोडल्याने शरीर आणि मेंदूला शांतता मिळते'.

मेडिटेशन आणि मांसपेशींना आराम - डोकं शांत करण्यासाठी मेडिटेशन हा सर्वात चांगला उपाय आहे. स्ट्रेस मॅनेजमेंट एक्सपर्ट डॉ. Cynthia Ackrill सांगतात की, तुम्ही गायडेट स्पील अॅप सुद्धा ट्राय करू शकता. ज्यातून स्लीप वेव्ह्ज निघतात. ते म्हणाले की, हळूवार श्वास घ्या. त्यावर लक्ष केंद्रीत करा. तुम्हाला चांगली झोप येईल'.

ब्लेमगेम बंद करा - आपल्या मेंदूमध्ये एक भाग असा असतो ज्यात सतत ब्लेमगेम खेळले जातात, असं डॉ. Cynthia Ackrill सांगतात. तुम्हाला काही बऱ्याच काळापासून समस्या असेल आणि त्यातून तुम्हाला अशी जाणीव झाली असेल की, झोप तुमच्यासाठी चांगली नाही. तर तुम्ही सतत झोप न घेतल्याने होणाऱ्या समस्यांचा विचार करता. आणि यातील अनेक गोष्टींसाठी तुम्ही स्वत:ला जबाबदार धरता. असं करू नका. जर तुमच्या मेंदूला दिवसभर खूप काम करावं लागत असेल तर कामातून थोडा वेळ ब्रेक घ्या. डोकं शांत करा. यात ब्रेकमध्ये तुम्ही श्वास घेणे आणि सोडणे यावर काम करा'.

झोपताना घड्याळ बघणं सोडा - बऱ्याच जणांना झोपतेवेळी घड्याळ बघून किंवा वेळ बघू झोपण्याची सवय असते. प्रोफेसर दासगुप्ता सांगतात की, झोपताना घड्याळ बघणं ही चुकीची सवय आहे. बरेचजण घड्याळ बघतात आणि त्यांच्याकडे झोपण्यासाठी किती वेळ राहिलाय. आणि या विचारामुळे अनेकजण झोपेच्या मधेच उठतात. त्यामुळे झोपताना घड्याळ बघणं किंवा वेळेचा विचार करणं बंद करा.

झोपण्याआधी दारू पिऊ नका - मयो क्लीनिकच्या स्लीप मेडिसिन एक्सपर्ट डॉ. भानू कोल्ला यांनी सांगितले की, झोपण्याआधी मद्यसेवन अजिबात करू नका. तुम्ही जर झोपण्यापूर्वी मद्यसेवन कराल तर चार तासात अल्कोहोलचं एका वेगळ्या द्रव्यात रूपांतर होतं ज्याने तुमची झोपमोड होते आणि तुम्ही जागे होता'.

तुमच्या चिंता लिहून काढा - एक्सपर्ट सांगतात की, उद्या काय करायचंय किंवा आज काय करायचं राहिलं ही चिंता तुमच्या झोपेचं खोबरं करू शकते. त्यामुळे ज्या गोष्टींची तुम्हाला चिंता आहे किंवा महत्वाच्या आहे त्या कागदावर लिहून काढा. तसेच दिवसभर तुम्ही काय चांगलं केलं आणि काय चुकवलं हेही लिहा याने तुम्हाला आराम मिळेल.

मोबाइल, लॅपटॉप, फोन नका वापरू - एक्सपर्ट सांगतात की, झोपण्याच्या १ तास पूर्वी फोन, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरू नका. याच्या किरणांना तुमची उडू शकते. तुम्ही तुमच्या चिंता लिहिण्यासाठीही या वस्तूंचा वापर करू नका. त्यासाठी पेन आणि कागद वापरा. जर तुम्हाला वाचता वाचता झोपण्याची सवय असेल तर पुस्तक वाचा टॅबलेटवर नको. या गॅजेटच्या प्रकाशाने मेटाटोनिनचं प्रमाण कमी होतं. मेलाटोनिन हे स्लीप हार्मोन आहेत. रात्री याचं प्रमाण अधिक असलं तर चांगली झोप लागते.

२० मिनिटांनी उठा आणि पुन्हा झोपा - जर तुम्हाला झोप लागत नसेल तर एक्सपर्ट सांगतात की, उठून बसा किंवा दुसऱ्या मंद प्रकाश असलेल्या खोलीत जाऊन डोकं शांत करा. तुम्ही पुस्तक वाचू शकता, शब्दकोडे सोडवा. फोन अजिबात हाती घेऊ नका किंवा टीव्हीही बघू नका. जर मोबाइल हाती घेऊन मेल चेक कराल किंवा सोशल मीडिया अपडेट्स बघाल तर झोपेचं जास्त खोबरं होईल, असं डॉ. दासगुप्ता यांनी सांगितले.