आकर्षक व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी या ५ गोष्टींना द्या प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 07:23 PM2018-04-12T19:23:59+5:302018-04-12T19:23:59+5:30

व्यक्तीमत्व खुलवण्यासाठी निरोगी शरीर व स्वच्छ मनाची आवश्यकता असते. त्यात दैनंदिन व्यवहारातील काही गोष्टींचाही महत्वाचा वाटा असतो. जर निरोगी व्यक्तीमत्वासाठी तुम्ही या काही छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचंही व्यक्तीमत्व आकर्षक दिसू शकतं.

१) पुरेशी झोप – निरोगी शरीरासाठी पुरेशी झोप मिळणं खूप गरजेचं असतं. कमी झोपेमुळे शारीरिक व मानसिक स्थितीवर परिणाम होतो. पुरेश्या झोपेमुळे बरेच आजार शरीरापासून दूर होतात.

२) नियमित आरोग्य तपासणी – दर सहा महिन्याने आरोग्याची तपासणी करणं आवश्यक असतं. त्यामुळे आपल्या शरीरात काही जीवनसत्वे किंवा पोषकसत्वांची कमतरता असल्यास ती भरून निघण्यास मदत होते.

३) पौष्टिक आहार – हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांचा आहारात समावेश केल्याने शरीर निरोगी राहतं. तसंच आवश्यक तेवढ्याच प्रमाणात आहार घेणं महत्वाचं असतं.

४) भरपूर पाणी प्या – शरीराला जेवढी आहाराची गरज असते त्यापेक्षा दुप्पट पाण्याची गरज असते. पाणी प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात

५) मानसिक स्थैर्य – आपण दिवसभर प्रत्येक छोट्या गोष्टींचा विचार करत असतो. आपल्या मेंदूलाही शरीरासारखी विश्रांतीची गरज असते. म्हणून जास्त मानसिक त्रास किंवा चिंता करू नका व आनंदी राहा.