वजन कमी करायचंय? प्या ही पाच पेयं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 14:16 IST2018-05-08T14:16:32+5:302018-05-08T14:16:32+5:30

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबू पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. सर्वात चांगले आणि सर्वात स्वस्त असे हे हेल्थ ड्रिंक आहे.
सफरचंद आणि दालचिनीच्या पाण्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त अशी तत्त्वं आहेत. यामध्ये खनिजं, जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडेंट असतात.
पुदिन्याचे पाणी : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पुदिन्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील गरमी कमी होण्यास मदत मिळते. पुदीन्याचे सेवन तुम्ही खाण्याच्या स्वरुपातही करू शकता.
काकडीचे पाणीदेखील शरीरासाठी आरोग्यदायी असे आहे. कारण काकडीमध्ये जीवनसत्त्वं बी, पॉटेशिअम, मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते.
संत्रामध्ये जीवनसत्त्व सी आहे आणि ते चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.