कॅन्सर, डायबिटीस, हार्ट डिजीजपासून दूर रहायचंय?; मग करा 'हे' काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 16:06 IST2019-06-18T15:51:03+5:302019-06-18T16:06:34+5:30

जर हेल्दी आणि फिट राहायचं असेल तर, एक्सरसाइज करणं गरजेचं असतं आणि एक्सरसाइज म्हटलं की, वॉकिंग हा सर्वांना आवडणारा आणि सोप असलेला उपाय. याचं कारण म्हणजे, वॉकिंगसाठी कोणतीच वस्तू लागत नाही. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही सकाळी किंवा रात्री अगदी कधीही वॉकिंग म्हणजेच चालण्यासाठी जाऊ शकता. अनेक संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, वॉक करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
आठवड्यातून 5 दिवस आणि प्रत्येक दिवशी 45 मिनिटं करा वॉकिंग
जर तुम्हाला हेल्दी रहायचं असेल तर आठवड्यातून 5 दिवस आणि 45 मिनिटांसाठी वॉक करा. वॉक केल्याने कॅन्सर, हार्ट डिजीज आणि डायबिटीज यांसारख्या आजारांचा धोका अनेक पटिंनी कमी होतो. त्याचबरोबर वॉक केल्याने झोपही शांत लागते. परंतु, झोपण्यापूर्वी जास्त वॉक करणं योग्य नसतं.
हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत
वॉकिंग, बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतं. वॉक केल्याने फक्त तुमचं वजनच कंट्रोलमध्ये राहत नाही तर हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठीही मदत होते. वॉक केल्याने शरीराची एनर्जी लेव्हलही उत्तम राहते. यामुळे तुम्ही अॅक्टिव्ह राहता आणि जास्त थकवा येत नाही.
जगभरातील सरासरी फक्त 5 हजार पावलं
अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार, आपल्याला प्रत्येक दिवशी कमीत कमी 10 हजार पावलं चालणं गरजेचं असतं आणि तुम्हाला गरज असेल तर तुम्ही पावलं मोजणारे अनेक अॅप्स आहेत. जे पावलांचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी तुमची मदत करतील. दरम्यान जगभरातील लोकांची दर दिवशी चालण्याची सरासरी क्षमता 5 हजार पावलं आहे.
हृदयाशी निगडीत आजारांचा धोका 10 टक्क्यांनी कमी
हार्वड यूनिवर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, प्रत्येक दिवशी 2 हजार पावलं एक्स्ट्रा चालल्याने हृदयाशी निगडीत आजारांचा दोका 10 टक्क्यांनी कमी होतो आणि डायबिटीजचा धोका 5.5 टक्क्यांनी कमी होतो. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी एक हजार पावलं एक्स्ट्रा चालल्याने मृत्यूचा धोकाही वाढतो.
कमीत कमी 7500 पावलं चालणं गरजेचं
जपानमध्ये लोक जगभरातील सर्वात जास्त अॅक्टिव्ह समजलं जातं. कारण ते प्रत्येक दिवशी 10 हजार 241 पावलं चालतात. अशातच जर तुम्ही प्रत्येक दिवशी 10 हजार पावलं चालू शकत नसाल तर कमीत कमी 7 हजार 500 पावलं चालणं गरजेचं असतं. कारण चालणं आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं.
टिप : वरील अनेक बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.