गोव्यात सांगोडोत्सवाची धूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 21:33 IST2017-08-31T21:29:50+5:302017-08-31T21:33:09+5:30

गोव्यात पाच, सात दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसजर्न होड्यांतून (नाव) करण्याची परंपरा अनेक गावांमध्ये खूप जुनी आहे.
दोन होड्यांना जोडायचे, सांगड घालायची म्हणजे सांगोडोत्सव.
या होड्यांमध्ये विविध पौराणिक चित्ररथांची आकर्षक मांडणी केलेली असते.
ती पाहण्यासाठी लोक नदीच्या दुतर्फा मोठी गर्दी करतात.
हिरव्याकंच सभोवतालात, शांत पाण्यामध्ये वाहणारा हा सांगोडोत्सव पाहणे आनंददायी असते.
त्याची चित्रमय झलक.