फुटबॉल ग्राउंडवर धावत आलेली ती 'बिकिनी गर्ल' आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 03:03 PM2019-06-03T15:03:16+5:302019-06-03T15:17:54+5:30

माद्रिद : सामना सुरू असताना चाहत्याने आपल्या लाडक्या खेळाडूला भेटण्यासाठी कडेकोट सुरक्षा भेदल्याचे अनेक दाखले देता येतील. पण एखाद्या महिलेने अशी सुरक्षा भेदल्याचे सहसा एकीवात आलेले नाही आणि तेही अत्यंत तोकड्या कपड्यात तर नाहीच नाही. पण, शनिवारी असा प्रकार पाहण्यात आला आणि अल्पावधीतच ती महिला जगभरात फेमस झाली.

युरोपियन चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना शनिवारी मध्यरात्री खेळवण्यात आला. टोदनहॅम आणि लिव्हरपूल या इंग्लिश प्रीमिअर लीगमधील दोन संघांत जेतेपदाचा सामना सुरू होता.या सामन्यात हा प्रकार घडला. प्रत्यक्ष सामना सुरू असताना एका महिलेने मैदानावर धाव घेतली. सुरक्षा रक्षकांनाही ती महिला कधी आली हे कळले नाही. काळ्या रंगाचा वन पीस तोकडा ड्रेस घातलेल्या या महिलेने सामन्यात बराच वेळ व्यत्यय आणला. मग काय चांगलीच पळापळ झाली. या महिलेची समजूत काढून कसंबसं तिला मैदानाबाहेर काढण्यात सुरक्षकांना यश आले.

किन्सी वोलांस्की असं त्या महिलेचे नाव आहे. वोलांस्की ही रशियन मॉडल असून यू ट्युबवरील प्रसिद्ध व्हिटली डोरोवेत्स्कीची ती गर्लफ्रेंड आहे. 2014साली झालेल्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डोरोवेत्स्कीने मैदानावर अशाच प्रकारे घुसखोरी केली होती.

या सामन्यातनंतर वोलांस्कीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. या कृतीपूर्वी इंस्टाग्रामवर तिचे 3 लाख चाहते होते, परंतु आता ती संख्या 2.2 कोटींहून अधिक झाली आहे.