फुटबॉल विश्वचषकासाठी आम्हीही सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 08:44 PM2018-07-13T20:44:44+5:302018-07-13T20:50:53+5:30

ऑक्टोबर महिन्यात मेक्सिकोत होणा-या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नायजेरिया संघ सज्ज होत आहे... गोंधळून जाऊ नका हा दिव्यांगांसाठीचा विश्वचषक आहे आणि त्यासाठी नायजेरियाचा दिव्यांग फुटबॉल संघ कसून सराव करत आहे.

दिव्यांग फुटबॉलपटू इमॅन्युयल इबियावूची त्याच्या मुलांसह राहत्या घरी परतताना. 16 वर्षीय इबियावूचीने रस्ता अपघातात आपले दोन्ही पाय गमावले. विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.

सराव सत्रानंतर नायजेरियाच्या खेळाडूंनी दिलेली पोझ.

चेंडूवर आपले कौशल्य दाखवताना नायजेरियाचा खेळाडू. प्रशिक्षक व्हिक्टर नीवेवे यांनाही संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

लागोस येथील सराव सत्रात नायजेरियाचे खेळाडू अथक परिश्रम घेत आहेत. रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत नायजेरियाच्या संघाला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता, परंतु दिव्यांगांचा हा संघ जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहे.

नायजेरियातील सुरूलेरे जिल्ह्यातल्या स्टेडियमवर हे सराव सत्र सुरू आहे. नायजेरियाचा संघ प्रथमच या स्पर्धेत खेळणार आहे.