बाबो; लिओनेल मेस्सीला इंग्लंडच्या टॉप क्लबकडून 6,070 कोटींची तगडी ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 07:02 PM2020-09-02T19:02:11+5:302020-09-02T19:16:35+5:30

लिओनेल मेस्सीनं बार्सिलोना क्लब सोडण्याचा घेतलेला निर्णय हा फुटबॉल विश्वाला मोठा धक्का देणाराच ठरला.

मागील आठवड्यात मेस्सीनं बार्सिलोना क्लब सोडण्याची इच्छा असल्याचे क्लब मालकांना सांगितले होते. बार्सिलोना सोबतचा मेस्सीचा करार जून 2021मध्ये संपुष्टात येणार होता.

मात्र, मेस्सीनं त्याच्या करारातील एक अट क्लबला दाखवून क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मेस्सी फुटबॉल मोसमाच्या अखेरीस कोणतीही भरपाई रक्कम न देता क्लब सोडू शकतो.

या नियमाचा कालावधी जूनमध्येच संपला आणि त्याला आता जून 2021पर्यंत क्लबसोबत रहावं लागेल, असा दावा बार्सिलोनाकडून करण्यात आला.

त्याला क्लबसोबतचा करार पूर्ण करावा लागेल अन्यथा 70 कोटी यूरो म्हणजेच 83 कोटी 70 लाखांची भरपाई क्लबला द्यावी लागेल.

पण, युरोपियन माध्यमांच्या दाव्यानुसार मेस्सीचा क्लब सोडण्याचा रस्ता मोकळा झाला आहे आणि इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर सिटी त्याला घेण्यासाठी उत्सुक आहेत.

मेस्सी मँचेस्टर सिटीसोबत 700 मिलियन डॉलरचा म्हणजेत 6,070 कोटींचा करार करण्याच्या तयारीत आहे. पाच वर्षांसाठी हा करार असेल आणि मेस्सीला क्लबमध्ये भागीदारीही दिली जाणार आहे.

मेस्सीचे वडील आणि त्याचे एजंट जॉर्ज मेस्सी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सहावेळा बॅलोन डी ओर पुरस्कार विजेता मेस्सी आता इपीएलमध्ये खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.