नाद करा, पण ख्रिस्तियानो रोनाल्डोचा कुठं! मैदानावर न उतरताच या गोष्टीतून कमावले ९२७ कोटी, AlNassr क्लबचेही नशीब फळफळले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 11:01 AM2023-01-04T11:01:17+5:302023-01-04T11:03:42+5:30

Cristiano Ronaldo officially unveiled as Al-Nassr player: पोर्तुगालचा सुपरस्टार... जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर सौदी अरेबियातील फुटबॉल क्लब अल नास्र ( Al-Nassr FC Club) कडून खेळणार यावर शिक्कामोर्तब झाले.

Cristiano Ronaldo officially unveiled as Al-Nassr player: पोर्तुगालचा सुपरस्टार... जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर सौदी अरेबियातील फुटबॉल क्लब अल नास्र ( Al-Nassr FC Club) कडून खेळणार यावर शिक्कामोर्तब झाले. अल नास्र क्लबच्या मैदानावर मोठ्या थाटात रोनाल्डोच्या आगमनाचा सोहळा पार पडला.

पाच वेळा बॅलोन डी ओर पुरस्कार विजेता ३७ वर्षीय रोनाल्डो अन् अल नास्र क्लब यांच्यात अडीच वर्षांचा करार झाला आहे. रोनाल्डो त्यासाठी वर्षाला १७३ मिलियन पाऊंड म्हणजेच १७४८ कोटी रुपये क्लबकडून घेणार आहे आणि त्यामुळे रोनाल्डो पुन्हा एकदा जगातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी एवढी मोठी रक्कम मोजणे अल नास्र क्लबसाठी फायद्याचीच ठरणारी आहे. याची प्रचिती तो मैदानावर उतरण्यापूर्वी झालेल्या कमाईतूनच येतेय. रोनाल्डोला आपल्या क्लबसाठी करारबद्ध केल्याच्या घोषणेनेच अल नास्र क्लबचे नशीब फळफळले आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध करण्याआधी अल नास्र क्लबचे इंस्टाग्रामवर ८ लाख फॉलोअर्सच होते. पण त्यांनी रोनाल्डोला करारबद्ध केल्याची घोषणा केली अन् ही फॉलोअर्सचा आकडा ८७ कोटींच्या वर गेला. रोनाल्डोसोबत अनेक ब्रांडही अल नास्र क्लबसोबत करार करण्यासाठी पुढे आले आहेत.

अल नास्र क्लबने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली. रोनाल्डोच्या ७ क्रमांकाची जर्सीही त्यांनी बाजारात विक्रीस आणली अन् पाहता पाहता ५ ते ६ लाखांहून अधिक जर्सीची विक्री झालीही. अजून डिमांड वाढत असल्याचे तेथील मीडियाने सांगितले.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाच्या जर्सी विक्रीतून क्लबने आतापर्यंत ९२७ कोटी ८९ लाख ९२,८०० रक्कम कमावले. यातील काही हिस्सा रोनाल्डोलाही मिळणार आहे. म्हणजे मैदानावर उतरण्यापूर्वीच स्टार खेळाडू व क्लबवर पैशांचा वर्षाव सुरू झाला आहे. रोनाल्डोची एक जर्सी ८० डॉलरला विकली जात आहे.

रोनाल्डोने २००९ ते २०१८ या कालावधीत स्पॅनिश क्लब रिआल माद्रिदसोबत उत्कृष्ट खेळ केला. या काळात त्याने दोन ला लीगा, दोन स्पॅनिश चषक, चार चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि तीन क्लब वर्ल्ड कप जिंकले आहेत. रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी एकूण ८०० हून अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने युव्हेंटसमध्ये तीन वर्षात दोन सिरी ए जेतेपद आणि एक कोपा इटालिया ट्रॉफीही जिंकली.