Fifa World Cup : सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडूला ११ कोटींची गाडी; मेस्सीच्या संघाला हरवल्याने 'राजा' खूपच खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 09:08 PM2022-11-25T21:08:34+5:302022-11-25T21:31:17+5:30

Fifa World Cup, ARG vs SUA : तीन वेळच्या आशियाई चषक विजेत्या सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला.

Fifa World Cup, ARG vs SUA : तीन वेळच्या आशियाई चषक विजेत्या सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला. दोन वेळच्या ( १९७८ व १९८६) वर्ल्ड कप विजेत्या अर्जेंटिनावर त्यांनी पिछाडीवरून विजय मिळवला. सौदी अरेबियाने २- १ अशा फरकाने लिओनेल मेस्सीच्या संघाला पराभवाचा धक्का दिला.

सौदी अरेबियाच्या बचावाला आज तोड नव्हता आणि अर्जेंटिनाला काही केल्या बरोबरीचा गोल करता आला नाही. या विजयानंतर सौदी अरेबियात जल्लोष झाला आणि एक दिवसाची राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यात सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी मोठी घोषणा केली.

लिओनेल मेस्सीने पेनल्टीवर अर्जेंटिलाना १०व्या मिनाटाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सौदी अरेबियाचे खेळाडू रेफरीच्या निर्णयावर नाखूश दिसले. चार वर्ल्ड कप स्पर्धेत ( २००६, २०१४, २०१८ व २०२२) अर्जेंटिनाकडून गोल करणारा लिओनेल मेस्सी हा पहिला खेळाडू, तर जगभरातील पाचवा खेळाडू ठरला.

दुसऱ्या हाफमध्ये सौदी अऱेबियाच्या सालेह अलशेहरीने ( ४८ मि.) गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. ५३व्या मिनिटाला सालेम अलदावसारीने १८ यार्डाच्या बॉक्सच्या कोपऱ्यावरून अर्जेंटिनाच्या बचावपटूंना चकवून भन्नाट गोल केला. सौदी अरेबियाने २-१ अशी आघाडी घेत अर्जेंटिनाच्या चाहत्यांना धक्का दिला.

आता अर्जेंटिनाची बरोबरी मिळवण्याची धडपड सुरू झाली आणि मेस्सी, मारिया जोडी सक्रिय झाली. १९७८ व १९८६च्या वर्ल्ड कप विजेत्या अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतीत ब्राझिल ( ५) व उरुग्वे ( २) यांच्यानंतर सर्वाधिक जेतेपद पटकावणारा संघ आहे, परंतु सौदी अरेबियासमोर त्यांचा खेळ निष्प्रभ ठरला.

या ऐतिहासिक विजयानंतर प्रिन्स मोहम्मद बिन सलाम अल सौद सौदी अरेबियातील प्रत्येक खेळाडूला Rolls Royce Phantom ही महागडी गाडी देण्याचे जाहीर केले आहे. भारतात या गाडीची किंमत ८.९९ कोटी पासने त १०.४८ कोटींपर्यंत आहे.