आखातात युद्ध, सिलेंडरची टंचाई, स्वयंपाक कसा करणार? टेन्शन घेऊ नका, गॅस न पेटवता बनवा हे पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 20:23 IST2026-03-10T20:17:31+5:302026-03-10T20:23:01+5:30
Make These Dishes without Using Gas: अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावरूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आखातामधील तणावामुळे जगभरातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. याचा भारतालाही फटका बसत असून, भारतामध्येही एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला दिसत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या दिसत आहेत.

अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावरूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आखातामधील तणावामुळे जगभरातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. याचा भारतालाही फटका बसत असून, भारतामध्येही एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला दिसत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या दिसत आहेत.

सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्याने केंद्र सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून सिलेंडरचं रेशनिंग करून गॅस बुकिंगबाबत काही नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा परिस्थितीत गॅस सिलेंडर न मिळाल्यास गॅसशिवाय बनवता येतील, अशा पाच पदार्थांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पनीर सँडविच
पनीर सँडविच हा नाश्त्यासाठीचा एक प्रोटिनयुक्त आणि आयोग्यदायी पदार्थ आहे. तो गॅसशिवाय अवघ्या काही मिनिटांमध्ये बनवता येऊ शकतो. पनीर सँडविच बनवण्यासाठी ब्रेडमध्ये किसलेला पनीर, दुधी, हिरवी चटणी आणि चाट मसाला टाका. त्यानंतर ब्रेड हलक्या हाताने दाबून खाण्यासाठी वाढा.

स्पाऊट्स सलाड
मोड आलेले मूग किंवा चण्यापासून तयार केलेलं स्प्राऊट्स सलाड हा सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. स्प्राऊट्स सलाड बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस आणि मीठ हे पदार्थ लागतात. स्प्राऊट्स सलाड हे प्रोटिनयुक्त असतं. गॅसशिवाय सहजपणे तयार होतं.

फ्रूट-दही बाऊल
फ्रूट-दही बाऊल हा नाश्त्यासाठी तयार करता येणारा आरोग्यदायी आणि चवदार पदार्थ आहे. फ्रूट-दही बाऊल बनवण्यासाठी दह्यामध्ये केळी, सफरचंद किंवा पपई यासारख्या फळांना कापून मिसळा. हवं असल्यास वर थोडं मध किंवा ड्राय फ्रूट टाका. अशा प्रकारे गॅसचा वापर न करता तुम्ही झटपट नाश्त्यासाठी पदार्थ तयार करू शकता.

चुरमुऱ्यांची भेळ
चुरमुऱ्यांची भेळ हासुद्धा नाश्त्यासाठी बनवता येणारा एक चविष्ट पदार्थ आहे. चुरमुऱ्याची भेळ बनवण्यासाठी चुरमुरे, शेव किंवा फरसाण, कांदा, कोथिंबीर, मसाला, मीठ असे पदार्थ लागतात. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही चुरमुऱ्यांची भेळ अगदी सहजपणे बनवू शकता.

दही पोहे
दही पोहे हा भारतामधील एक प्रसिद्ध नाश्ता आहे. दही पोहे बनवण्यासाठी पोहे हे दही, साखर किंवा गुळामध्ये मिसळलं जातं. हा पदार्थ पचण्यासाठी हलका असतो. तसेच गॅसचा वापर न करता तयार करता येतो.

















