बद्धकोष्टामुळे हैराण आहात?; मग 'हे' पदार्थ खा आणि मोकळे व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 04:24 PM2019-06-16T16:24:33+5:302019-06-16T16:34:01+5:30

सध्या सर्दी-खोकल्याप्रमाणे बद्धकोष्ट म्हणजेच, कॉन्स्टिपेशन एक कॉमन समस्या होत आहे. अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. एक्सरसाइजची कमतरता, पाणी कमी पिणं, मुबलक प्रमाणात फायबर असणाऱ्या पदार्थांचं सेवन न करणं, सतत बाहेरचे पदार्थ खाणं आणि खासकरून जंक फूड खाण्यामुळे बद्धकोष्टाची समस्या वाढत आहे. अशातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, काही अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने ही समस्या दूर करण्यास मदत होईल. (Image Credit : Organic Facts)

बद्धकोष्टावर उपचार म्हणून आंब्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यामध्ये आंबा खाणं उत्तम मानलं जातं. आंब्यामध्ये फायटोकेमिकल्स असतात. जे पोट स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. जर तुम्हीही क्रॉनिक कॉन्स्टिपेशनच्या समस्येने ग्रस्त असाल तर दररोज आंब्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.

दही आणि ताक पोटामध्ये गुड बॅक्टेरिया वाढवण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. अशातच जर तुम्ही जास्तीत जास्त गुड बॅक्टेरिया असणाऱ्या पदार्थांचे सेवन करत असाल तर पोटाची पचनक्रिया उत्तम पद्धतीने काम करते आणि बद्धकोष्टाची समस्या दूर होते.

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. पपई आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी मदत करते. पपईच्या दररोज सेवनाने पोटाचं आरोग्य उत्तम राहण्यासही मदत होते.

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे पोटामध्ये असलेलं मल सॉफ्ट करून शरीरातून सहज बाहेर टाकण्यास मदत करतं. तुम्हाला गरज असेल तर कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून पिऊ शकता. लिंबाचा रस आणि पाणी शरीरावा अल्काइन तयार करतात ज्यामुळे बद्धकोष्टाची समस्या दूर होते.

रात्री झोपण्यापूर्वी एक तास अगोदर एक ग्लास गरम पाण्यामध्ये 1 ते 2 ग्रॅम चूर्ण एकत्र करून त्याचं सेवन करा. पोट साफ होण्यास मदत होते.

दूध किंवा गरम पाण्यासोबत 2 चमचे इसबगोल घ्या. दूधासोबत घेणं उत्तम ठरतं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.