फराळाचा दणका आणि पोटात 'जाळ'; दिवाळीत अॅसिडिटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'हे' ७ सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 19:04 IST2025-10-20T18:57:20+5:302025-10-20T19:04:52+5:30
दिवाळीत लाडू, बर्फी आणि अन्य मिठाईचा मोह आवरणे कठीण असते, पण यामुळे छातीत होणारी जळजळ तुमचा उत्सव बिघडवू शकते.

दिवाळीचा आनंद फराळात आहे, पण अतिगोड आणि तेलकट पदार्थांमुळे पचनक्रियेवर ताण येतो. त्यामुळे फराळ खाताना अॅसिडिटीचा जाळ टाळण्यासाठी प्रमाण नियंत्रित ठेवायला हवं.
दिवाळीच्या उत्साहात गोड-तिखट फराळाचे पदार्थ चवीने खाल्ले जात असले तरी त्यामुळे पोटात जळजळ, आम्लपित्तची समस्या भेडसावते. तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थाचे अति सेवन, कमी पाणी पिल्यामुळेही अॅसिडिटी वाढते असे तज्ज्ञ सांगतात.
फराळामुळे अॅसिडिटी झाल्यास लगेच औषधे न घेता, नैसर्गिक उपायांचा आधार घ्या. ताक, ओवा किंवा लिंबू-मध मिश्रित कोमट पाणी हे साधे घरगुती उपाय तुम्हाला तात्काळ आराम देऊ शकतात.
तेलकट पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक पाण्याची गरज असते. फराळ करत असताना कमी पाणी पिणे हे अॅसिडिटी वाढण्याचे मोठे कारण आहे. त्यामुळे, 'अॅसिडिटी टाळा, पाणी प्या' हा नियम कटाक्षाने पाळा.
केवळ दिवाळीपुरते नव्हे, तर पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. अॅसिडिटी टाळण्यासाठी जंक फूड आणि तेलकट पदार्थ कायमचे टाळण्याचा संकल्प करा.