'तुझ्या माझ्या संसाराला'मध्ये अदितीचा झालेले मेकओव्हर देशमुखांच्या घरात घेऊन येणार का नवं वादळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:43 IST2022-02-16T12:59:17+5:302022-02-16T13:43:16+5:30

एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं हि मालिका प्रेक्षकांची आवडती आहे.(Photo Instagram)

त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलीशी वाटते. (Photo Instagram)

नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि सिडचे अमेरिकेला जाण्यासाठी प्रयत्न चालू होते हे सत्य अदिती मोठ्या बाईंना सांगते आणि त्यांना जबरदस्त धक्का बसतो व त्या चक्कर येऊन पडतात. (Photo Instagram)

मोठ्याबाईंना चक्कर आल्याचा, धक्का बसल्याचा संपूर्ण दोष सिड व देशमुख कुटुंबातील बायका अदितीला देतात. (Photo Instagram)

अदिती सिडसमोर तिने मोठ्याबाईंना तुला अमेरिकेला जायचंय असं खरं सांगितल्याचं सांगते त्यामुळे आता मालिकेत एक विलक्षण वळण येणार आहे.(Photo Instagram)

सिड अदितीला तू खोटं बोल्लीस असं मोठ्या बाईंना सांगायला सांगतो. अदिती सारं स्वतःवर घ्यायला तयार होते. त्यासाठी मुद्दाम घरातल्यांनी तिचा तिरस्कार करावा अशी वागू लागते. (Photo Instagram)

देवळात जायला बायका निघतात तर अदिती वन पिस ड्रेस घालून येते आणि मुद्दाम अशा काही गोष्टी करते जेणेकरून कुटुंबियांना तिचा राग येईल. (Photo Instagram)

अदितीच्या अशा वागण्यामुळे देशमुख कुटुंबीय दुखावतील का? सिड सगळ्यांना खरं सांगेल का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.(Photo Instagram)