Salman Khan : आईबाबा की भावंड? सलमान खानच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा कोण असेल वारस?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 08:00 IST2022-11-26T08:00:00+5:302022-11-26T08:00:02+5:30
Salman Khan : सलमान खान बॉलिवूडचा टॉपचा अभिनेता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत दबदबा असलेल्या भाईजानकडे किती संपत्ती आहे तर 2300 कोटींची...

दबंग खान सलमान खान बॉलिवूडचा टॉपचा अभिनेता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत दबदबा असलेल्या भाईजानकडे किती संपत्ती आहे तर 2300 कोटींची.
होय, सलमान 2300 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते.
2016 मध्ये ‘सुल्तान’ या सिनेमासाठी त्याने कथितरित्या 100 कोटी मानधन वसूल केल्याचं तुम्ही ऐकलं असेलच. पुढच्याच वर्षी आलेल्या ‘टायगर जिंदा है’ साठी त्याने म्हणे 130 कोटी चार्ज केल्याचं म्हटलं जातं.
अनेक अलिशान गाड्या त्याच्या दिमतीला हजर आहेत. पनवेलमध्ये सलमानच्या मालकीचं फार्म हाऊस आहे.
शहरापासून फक्त एक तासाच्या अंतरावर असलेल्या या फार्म हाऊसमध्ये एक भव्य स्विमिंग पूल, जिम आणि हिरवळ आहे. या फार्म हाऊसची किंमत सुमारे 80 कोटी रुपये आहे.
मुंबईतील वांद्रे भागात सलमान खानचा 30 कोटी रुपये किमतीचा ट्रिपलेक्स फ्लॅट आहे. या चार बीएचके फ्लॅटमध्ये वरच्या मजल्यावर स्विमिंग पूल, मधल्या मजल्यावर पार्टी हॉल व पूल टेबल आणि खालच्या मजल्यावर राहण्याची सोय आहे.
सलमान मुंबईतील वांद्रे वेस्ट येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे 16 कोटी रुपये किंमत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान आपल्या पालकांसोबत राहत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानने मुंबईतील धारावी येथील गोराई या गावात एक भव्य मालमत्ता खरेदी केली आहे. 51व्या वाढदिवशी त्याने स्वत: साठी एक मोठं बीच हाऊस खरेदी केलं आहे.
अगदी विदेशातही त्याची संपत्ती आहे. दुबईच्या बुर्ज खलिफाजवळील द अॅड्रेस डाउनटाऊन येथे सलमान खानच्या मालकीचं एक आलिशान अपार्टमेंट असल्याचं कळतं.
एकंदर काय तर सलमान एकटा कोट्यवधी रूपयांचा मालक आहे. अर्थात अद्याप सलमानचं लग्न झालेलं नाही. त्याला मुलंबाळं नाहीत. त्यामुळे या संपत्तीचा वारस कोण असणार? असा प्रश्न अनेकांना पडतो.
तर खुद्द सलमानने एका मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. ‘मी लग्न करो किंवा नाही, माझ्या संपत्तीवर ट्रस्टचा हक्क असेल. माझं लग्न झालं तर अर्धी मालमत्ता ट्रस्टला दान केली जाईल. जर, मी लग्न केलं नाही तर माझी संपूर्ण मालमत्ता ट्रस्टला दिली जाईल.’ असं त्याने यावेळी सांगितलं होतं.