'Bigg boss'च्या घरात आलेली नीथा शेट्टी आहे तरी कोण? 'गंदी बात'मध्ये दिलेत जबरदस्त बोल्ड सीन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 10:12 AM2021-11-01T10:12:06+5:302021-11-01T10:18:21+5:30

Neetha shetty: नीथाने आतापर्यंत २९ मालिका आणि चारपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोबतच तिने काही वेब सीरिजमध्ये झळकली आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेला जाणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी. नुकतीच या घरातून अविष्कार दारव्हेकरची एक्झिट झाली आहे. पण त्याच सोबत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची वाईल्ड कार्ड एण्ट्रीदेखील झाली आहे.

बिग बॉसच्या घरात आदिश वैद्यनंतर ही दुसरी वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली असून सध्या सोशल मीडियावर या नव्या सदस्याची चर्चा रंगली आहे.

बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात अभिनेत्री नीथा शेट्टी-साळवी या अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या येण्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याच्या भुवया उंचावल्या आहेत.

आविष्कार घरातून बाहेर पडल्यानंतर घरातील सदस्यांनी नीथाचं स्वागत केलं. सोबतच तिच्याविषयी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळेच घरात आलेली ही नवीन सदस्य नेमकी कोण आहे ते जाणून घेऊयात.

बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे आलेली नीथा शेट्टी ही मराठी आणि हिंदीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिकांसह वेब सीरिपर्यंत अशा अनेक माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'तेनाली रमण', 'घरी की लक्ष्मी बेटियाँ', 'परावतार श्री कृष्ण' अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. या मालिकांमध्ये ती अत्यंत साध्या, गुणी अभिनेत्रीच्या रुपात झळकली आहे.

अनेक मालिकांमध्ये सोज्वळ भूमिका साकारणाऱ्या नीथाने Gandii Baat 4 मध्ये प्रचंड बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये काम करण्यापूर्वी ती प्रचंड घाबरली होती.

नीथाने आतापर्यंत २९ मालिका आणि चारपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोबतच तिने ओटीटीवरही पदार्पण केलं असून काही वेब सीरिजमध्ये झळकली आहे.

कायम हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करणारी नीथा साडीमध्येही तितकीच सुंदर दिसत असून तिच्या पारंपरिक वेशातील फोटोलाही नेटकरी प्रचंड प्रतिसाद देतात.

तेनाली रमण या मालिकेत नीथा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. या मालिकेच्या सेटवरील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यातलाच हा एक फोटो ( फोटो सौजन्य: नीथा शेट्टी फेसबुक पेज)