आता खूप ग्लॅमरस दिसते 'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना, अभिनयाऐवयी या क्षेत्रात करतेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:09 IST2025-11-12T13:54:42+5:302025-11-12T14:09:00+5:30
'Mr. India' Movie : 'मिस्टर इंडिया' या सिनेमात एक मुलगी, जिने चित्रपटात 'टीना'ची भूमिका साकारली होती, तिच्या निरागसतेवर लोक फिदा झाले होते. होय, तीच टीना जिचा चित्रपटात बॉम्बस्फोटात मृत्यू होतो.

१९८७ साली अनिल कपूर आणि श्रीदेवी अभिनित चित्रपट 'मिस्टर इंडिया' सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्स पुरेपूर पाहायला मिळाला होता. या चित्रपटात लहान मुलांची एक फौज देखील दाखवण्यात आली होती, ज्यांनी आपल्या अभिनयाने लोकांना खूप प्रभावित केले होते.

'मिस्टर इंडिया' या सिनेमात एक मुलगी, जिने चित्रपटात 'टीना'ची भूमिका साकारली होती, तिच्या निरागसतेवर लोक फिदा झाले होते. होय, तीच टीना जिचा चित्रपटात बॉम्बस्फोटात मृत्यू होतो.

या चित्रपटात टीनाची भूमिका उत्कृष्टपणे साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव हुजान खोदैजी (Huzaan Khodaiji) आहे. हुजान खोदैजी आता मोठी, सुंदर आणि ग्लॅमरस झाली आहे.

हुजान खोदैजीचे काही फोटो समोर आले आहेत, जे पाहिल्यानंतर चाहत्यांना तिला ओळखणेही कठीण झाले आहे.

हुजान खोदैजी सोशल मीडियावर सक्रीय आहे. पण तिने आपले प्रोफाइल खासगी ठेवले आहे. तरीही, चाहत्यांना तिचे फोटो कुठून ना कुठून मिळतच राहतात.

हुजान खोदैजीचे लेटेस्ट फोटो सध्या व्हायरल होत आहे, त्यात तिला निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पाहता येते. फोटोत हुजान खूपच गोड दिसत आहे.

हुजानच्या गालावर पडणारे खळ्या तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर लोक पुन्हा एकदा तिच्या क्युटनेसवर फिदा झाले आहेत.

'मिस्टर इंडिया'मध्ये काम केल्यानंतर हुजान पुन्हा दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती मार्केटिंग क्षेत्रात नाव कमावत आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, हुजान खोदैजी लिंटास नावाच्या एका कंपनीत अॅडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहे.

















