एकेकाळी दुसऱ्यांकडे ही अभिनेत्री करायची धुणीभांडी, अशी बनली बॉलिवूडची प्रसिद्ध खलनायिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:28 IST2025-05-05T18:22:15+5:302025-05-05T18:28:27+5:30

बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री ज्यांनी एकेकाळी आपल्या अभिनयाने, सौंदर्याने बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं होतं. त्यांनी चित्रपटातून पैसा, प्रसिद्धी सर्व काही कमावलं. पण या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली होती. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला होता.

बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री ज्यांनी एकेकाळी आपल्या अभिनयाने, सौंदर्याने बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमावलं होतं. त्यांनी चित्रपटातून पैसा, प्रसिद्धी सर्व काही कमावलं. पण या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली होती. त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला होता.

आम्ही बोलत आहोत दिवंगत अभिनेत्री शशिकला यांच्याबद्दल. ज्यांचे आयुष्य नेहमीच दुःखाने भरलेले होते. त्या लहान असताना त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात तोटा झाला, त्यानंतर त्यांना मोलकरीण व्हावे लागले. जेव्हा त्या अभिनेत्री बनल्या आणि लग्न केले तेव्हा त्यांना त्यांच्या पतीकडून प्रेम मिळाले नाही आणि त्यांनी एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर केले, पण इथेही त्यांना फक्त वेदनाच मिळाल्या.

शशिकला सहगल यांनी वयाच्या ११ व्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सहाय्यक भूमिका साकारून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. परंतु, त्यांनी त्यांची वैयक्तिक आयुष्यात इतके दुःख सहन केले की ते जाणून तुम्हीही भावनिक व्हाल.

शशिकला लहान असताना त्यांच्या वडिलांना व्यवसायात मोठे नुकसान झाले, त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. मात्र, मुंबईत त्यांच्याकडे घर नव्हते आणि जेवणासाठी पैसेही नव्हते. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीला कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली.

जेव्हा शशिकला लोकांच्या घरी झाडू, पुसणे आणि भांडी धुण्यासाठी जात असत, तेव्हा लोक त्यांना म्हणायचे की तू खूप सुंदर आहेस, तू अभिनेत्री का बनत नाहीस. त्यानंतर, त्यांच्या वडिलांच्या पाठिंब्याने शशिकला यांनी अभिनयाच्या जगात प्रवेश केला.

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शशिकला यांनी ओपी सहगल यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर त्या घराची काळजी घ्यायच्या आणि चित्रपटांमध्येही काम करायच्या. त्यांना दोन मुलीही झाल्या.

लग्नाच्या काही काळानंतर ओपी सहगल यांना व्यवसायात मोठे नुकसान झाले आणि शशिकला यांच्या पैशाने घर चालवणे कठीण झाले. अशा परिस्थितीत, दोघांमध्ये भांडणे होऊ लागली, ज्याचा परिणाम त्यांच्या दोन्ही मुलींवरही होऊ लागला.

या काळात, जेव्हा शशिकला यांना त्यांच्या पतीकडून प्रेम आणि पाठिंबा मिळाला नाही, तेव्हा शशिकला दुसऱ्या व्यक्तीशी जवळीक साधू लागल्या आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. परिस्थिती अशी होती की अभिनेत्री त्यांचा पती आणि मुलींना सोडून त्यांच्या प्रियकरासह परदेशात पळून गेल्या.

पण परदेशात गेल्यानंतर, त्या व्यक्तीने शशिकला यांच्यावर अत्याचार आणि मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्या भारतात परतल्या पण त्यांच्या कुटुंबाने त्यांना नाकारले.

त्यानंतर शशिकला यांना रस्त्यावर राहावे लागले, त्या वेड्यासारखी फिरत असायच्या. रस्त्यावर जे काही मिळायचे ते खात असत. या काळात मदर तेरेसा त्यांना मदत करत होत्या आणि अभिनेत्रीने मदर तेरेसासोबत अनेक वर्षे लोकांची सेवा केली. २०२१ मध्ये या अभिनेत्रीचे निधन झाले.