Terence Lewis : "मी लिव्ह इनमध्ये राहिलोय, खूश राहण्यासाठी लग्नाची गरज नाही, आयुष्यात कधीच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:49 IST2025-04-14T15:32:53+5:302025-04-14T15:49:58+5:30

Terence Lewis : टेरेन्सने ईटाईम्सशी संवाद साधला. यावेळी त्याने तो सिंगल असल्याचं स्पष्टपणे सांगितलं.

टेरेन्स लुईस हा एक उत्कृष्ट डान्सर आहे. तो ५० वर्षांचा असून अजूनही सिंगल आहे. सायंतनी घोषसोबत त्याच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली होती..

टेरेन्सने ईटाईम्सशी संवाद साधला. यावेळी त्याने तो सिंगल असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. तसेच त्याला लग्न करायचं नाही आणि तो लग्नासाठी तयार देखील नसल्याचं म्हटलं आहे.

"मी आधी कोणाला तरी डेट करत होतो पण आता मी सिंगल आहे आणि यातच खूप खूश आहे. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत."

"एक कलाकार असल्याने मला थोडी स्पेस हवी आहे. मी असा व्यक्ती आहे, ज्याला १२ तासांनंतर कोणाचाच चेहरा पाहायचा नसतो."

"मला घरी जायचं असतं. स्वत:वर जास्त लक्ष केंद्रीत करायचं आहे. यातच मी खूप जास्त आनंदी आहे."

"मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही कारण मी याआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे."

"खूश राहण्यासाठी लग्न करण्याची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही."

"मला असं कोणीच आयुष्यात नको जे माझ्या आनंदाचं कारण बनेल" असं टेरेन्स लुईसने म्हटलं आहे.

टेरेन्स सायंतनी घोषच्या आधी तो दुसऱ्या कोणासोबत तरी दहा वर्षे लिव्ह इनमध्ये राहत असल्याचं सांगितलं.

टेरेन्स लुईस हा लोकप्रिय कोरियोग्राफर असून सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असतो. त्याचे असंख्य चाहते आहेत.