IN PICS : ‘गो बॅक मोदी’ म्हणणारी अभिनेत्री ओविया हेलेन आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 11:24 IST2021-02-17T11:12:50+5:302021-02-17T11:24:37+5:30
मोदींविरोधात ट्विट करणं चांगलंच महागात पडणार

‘गो बॅक मोदी’ म्हणत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ट्विट करणारी अभिनेत्री ओविया हेलेन सध्या जाम चर्चेत आहेत.
मोदींविरोधात टिष्ट्वट करणे ओवियाला महाग पडण्याची चिन्हे आहेत. कारण आता याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आता थेट मोदींविरूद्ध दंड थोपटणारी ही ओविया कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेन. तर ओविया एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
ओवियाचे पूर्ण नाव हेलेन नेल्सन असे आहे. तामिळ बिग बॉसमध्ये ओविया स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यानंतर ती अचानक प्रकाशझोतात आली.
मॉडेल अशीही तिची ओळख आहे. मॉडेलिंगपासून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली.
तामिळ, मल्याळम, कन्नड अशा अनेक सिनेमात तिने काम केलेय. 2007 साली ‘कांगारू’ या मल्याळम चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.
त्यानंतर अपुर्वा, नालाय नमधे, कालवनी, मरिना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
ओवियाला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘मुथुकु मुथागा’ या चित्रपटामुळे. 2011 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
अभिनयासोबतच ओविया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. समाजात घडणाº्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. नुकतेच तिने नरेंद्र मोदींविरोधात ट्विट करुन खळबळ माजवली होती.
नरेंद्र मोदींच्या तामिळनाडू दौ-यापूर्वी ओवियाने एक ट्विट केले असून ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ओविया हेलेनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 13 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदींविरोधात एक ट्विट केले होते. गो बॅक मोदी असे तिने लिहिले होते.
नरेंद्र मोदींच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर राजकीय अजेंड्याखाली जनतेला भडकवण्यासाठी अभिनेत्रीने हे ट्वीट केल्याचा दावा भाजपाने केला आहे.