"तुम्ही तर हगवणे ग्रुपचे सदस्य निघालात", प्राची पिसाटला अश्लील मेसेज केल्यानंतर अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:35 IST2025-05-27T11:30:23+5:302025-05-27T11:35:34+5:30
'कोण होतीस तू काय झालीस तू'मधील अभिनेता सुदेश म्हशिळकर अभिनेत्री प्राची पिसाटला अश्लील मेसेज केल्याने चर्चेत आले आहेत. प्राचीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता सुदेश यांना नेटकऱ्यांनी खडे बोल सुनावत त्यांना ट्रोल केलं आहे.

"तुझा नंबर दे...फ्लर्ट करायची इच्छा झालीये", "सेक्सी दिसतेस", असे मेसेज सुदेश यांनी प्राचीला केले होते. याचे स्क्रीनशॉट प्राचीने तिच्या सोशल मीडियावर शेअर करत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला होता.
या पोस्टमधून तिने सुदेश यांनी माफी मागावी असंही म्हटलं होतं. प्राचीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता सुदेश यांना नेटकऱ्यांनी खडे बोल सुनावत त्यांना ट्रोल केलं आहे.
सुदेश यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "तुम्ही तर हगवणे ग्रुपचे सदस्य निघालात.... तुमच तोंड काळं केलं पाहिजे... अजुन कीती मुलींना..जाळ्यात ओडलायत कोणास ठाऊक...", अशी कमेंट एकाने केली आहे.
"नंबर भेटला का आजोबा?", "नंबर पाहिजे का? नोट करा - 100", अशा कमेंटही केल्या आहेत.
"आपलं वय काय....आपण करतोय काय.... काका...at least काकूंना तरी शोधा.... काय मुलीच्या वयाच्या मुलींना मेसेज करता", असंही म्हटलं आहे.
"काका अशा गोष्टी करायला तुम्हाला खरंच शोभतय का? तुम्ही नातवंडायचे झाले तुम्ही तुमच्यासारख्या राक्षसी माणसांमुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक्ट्रेस वर अत्याचार होत आहे. तुमच्यासारख्या लोकांना सरळ करायला राज ठाकरे साहेबच पाहिजे", अशा कमेंटही केल्या आहेत.
प्राची पिसाटने पोस्ट शेअर केल्यानंतर अद्याप सुदेश यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.