'जवळपास बॉयफ्रेंडनं मारुनच टाकलं होतं..', श्रद्धा मर्डर केसनंतर 'स्त्री' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:22 IST2022-12-07T13:18:02+5:302022-12-07T13:22:21+5:30
अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं फक्त तिला मारझोडच केली नाही तर तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती.

गंदी बात फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीने अलीकडेच तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाबद्दल उघडपणे बोलली आहे. मीटू दरम्यान फ्लोराने तिच्या लिव्ह-इन पार्टनरने तिचे लैंगिक शोषण कसे केले हे उघड केले.
फ्लोरा सैनी म्हणाली की त्याला तिला कसे मारायचे होते. त्याने अभिनेत्रीला धमकी दिली की जर तिने त्याला सोडले तर तो तिच्या आई वडिलांना जीवे मारेल.
न्यूज१८ ला दिलेल्या मुलाखतीत फ्लोराने सांगितले की, तिचा प्रियकर चित्रपट निर्माता होता. त्याच्यासोबत राहण्यासाठी तिने घर सोडले होते. प्रियकराने फ्लोराला तिचे त्याच्यावर किती प्रेम आहे हे सिद्ध करण्यास सांगितले.
अभिनेत्री म्हणाली की तो सुरुवातीला इतका गोड वागत होता की त्याचे वास्तव पालकांनाही दिसत नव्हते. पण एकत्र राहिल्यानंतर आठवडाभरातच त्यांचा खरा चेहरा समोर आला.
फ्लोराला तिच्या प्रियकराने मारहाण केली. तो एक चांगला माणूस असताना, त्याने असे का केले हे फ्लोराला समजले नाही. तिने घडलेला प्रकार कोणाला सांगू नये म्हणून त्या व्यक्तीने फ्लोरा कडून तिचा फोनही घेतला होता.
प्रियकराने अभिनेत्रीला धमकीही दिली की जर तिने कोणाला सांगितले आणि त्याला सोडण्याचा प्रयत्न केला तर तो तिच्या पालकांना ठार करेल.
या घटनेचे वर्णन करताना फ्लोराने सांगितले की, एका रात्री त्याने अभिनेत्रीला इतका मारला की तिचा जबडा तुटला. त्या रात्री तो तिला ठार मारणार होता असे त्याने सांगितले.
त्यावेळी फ्लोराला तिच्या आईचे शब्द आठवले की जेव्हाही तुम्ही अशा परिस्थितीत अडकता तेव्हा तुमच्याकडे पैसे आहेत की नाही, कपडे आहेत की नाही याचा विचार करू नका, तिथून पळून जा. फ्लोरानेही तेच केले आणि थेट तिच्या घरी धाव घेतली.
यानंतर फ्लोरा तिच्या आई-वडिलांसोबत तिच्या प्रियकराच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली. पण पोलिसांनी प्रियकराच्या सांगण्यावरून तक्रार नोंदवण्यास नकार दिला. नंतर कसेतरी फ्लोराने हाताने लिहून तक्रार नोंदवली.