पाहा, ‘ससुराल सिमर का’फेम मनीष रायसिंघनचा वेडिंग अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 14:18 IST2020-07-03T14:18:40+5:302020-07-03T14:18:40+5:30

‘ससुराल सिमर का’ या लोकप्रिय मालिकेचा अभिनेता मनीष रायसिंघन नुकताच ‘नागिन 3’फेम संगीता चौहानसोबत लग्नबेडीत अडकला.
आता या नवदांम्पत्याने आपल्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मनीष व संगीताचा अंदाज बघण्यासारखा आहे.
गुरुद्वारात पंजाबी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता.
लॉकडाऊन आणि कोरोना या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता.
नवरा-नवरी दोघेही यावेळी मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसले. यावेळी दोघांनीही मास्क लावले होते.
लॉकडाऊनमुळे मनीष व संगीताचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन व्हर्च्युअल झाले होते.
संगीता व मनीष दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते.
स्वाभिमानच्या सेटवर दोघेही पहिल्यांदा भेटले होते.