सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 01:38 IST2025-05-04T01:16:15+5:302025-05-04T01:38:11+5:30

Sara Tendulkar Dating Bollywood Actor: सारा तेंडुलकर आणि 'तो' अभिनेता गेल्या काही दिवसांत अनेकदा एकत्र दिसलेत

बॉलिवूड सेलिब्रिटींचे व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य, सारं काही सोशल मीडियावर चर्चेत असतं. विशेषतः सेलिब्रिटींच्या डेटिंग लाईफबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होतात.

आता अशी चर्चा आहे की मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही एका बॉलिवूडच्या युवा आणि फिटनेसच्या बाबतीत दमदार असलेल्या अभिनेत्याला डेट करत आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हा गली बॉय या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आला. 'गेहराइया' चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत भरपूर किसिंग सीन दिल्याने तो चर्चेत आला होता.

सध्या सारा त्याच सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पण नेहमीप्रमाणेच सिद्धांत किंवा सारा यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

फिल्मफेअरमधील एका वृत्तानुसार, सारा तेंडुलकर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. तेव्हापासून सारा आणि सिद्धार्थ यांच्या डेटिंगबद्दलची चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धांत आणि साराच्या मैत्रीचे हे सुरुवातीचे दिवस आहेत, पण दोघांमध्ये खूपच छान केमिस्ट्री आहे. सार्वजनिक ठिकाणी दोघेही एकमेकांची साथ एन्जॉय करतात, एकमेकांसोबत खूप कंफर्टेबल दिसतात.

यापूर्वी अशी चर्चा होती की सिद्धांत चतुर्वेदी हा बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिला डेट करत आहे. पण नव्या किंवा सिद्धांत दोघांनीही याची कधीही पुष्टी केली नाही.

सारा तेंडुलकरचे नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडले जात होते. सोशल मीडियावरील पोस्ट, सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसल्याने दोघांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या. पण दोघांनीही कधी नात्याची कबुली दिली नाही.