समृद्धी केळकरचा ग्रेसफुल लूक; वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 18:29 IST2024-03-14T18:19:41+5:302024-03-14T18:29:59+5:30
Samruddhi kelkar: समृद्धी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून ती नावारुपाली आली.
समृद्धी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
अलिकडेच समृद्धीने एक फोटोशूट केलं आहे. यात तिने हिरव्या रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे.
समृद्धीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे तिचा हा नवा लूक चाहत्यांच्या पसंतीत उतरत आहे.
समृद्धी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक नृत्यांगनादेखील आहे. तिने कथ्थकमध्ये अलंकाराची पदवी घेतली आहे.
फुलाला सुगंध मातीचा या मालिकेपूर्वी तिने लक्ष्मी सदैव मंगलम, पुढचं पाऊल, लेक माझी लाडकी, ढोलकीच्या तालावर या मालिका, कार्यक्रमात काम केलं आहे.
समृद्धीच्या फोटोवर सध्या लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.