Salman Khan Niece: सलमान खानची भाची बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज, पाहा कशी दिसते
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 20:57 IST2022-11-22T20:50:49+5:302022-11-22T20:57:48+5:30
Alizeh Agnihotri Debut: पहिल्याच चित्रपटाचा दिग्दर्शक आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

Salman Khan Niece Alizeh Agnihotri Bollywod Debut: सलमान खान आजही आपल्या चित्रपटातून लोकांचे मनोरंजन करत असतो. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील पुढील पिढीही चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सज्ज होत आहे.
अतुल आणि अलविरा अग्निहोत्री यांची मुलगी अलीजे अग्निहोत्री ही सलमान खानची भाची आहे. सलमान खानची भाची अलीजे अग्निहोत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीजे जवळपास दोन वर्षांपासून अभिनय आणि नृत्य शिकत आहे. त्यामुळे आता ती तिच्या डेब्यू चित्रपटासाठी पूर्णपणे तयार आहे.
सलमान खानच्या भाचीने तिच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. अलीजे अग्निहोत्रीला पहिल्याच सिनेमात एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
अलीजेने तिच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याचे सांगितले जात आहे. सलमान खानच्या भाचीचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अशा वेळी, अलीजे अग्निहोत्री मोठ्या पडद्यावर तिची जादू चालवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अलीजे हिला राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकासोबत पहिला चित्रपट करायला मिळतोय. अलीजेने ज्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे, त्याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते सौमेंद्र पाधी करत आहेत.
या चित्रपटाची स्क्रिप्ट नेहमीच्या धाटणीच्या विचारसरणीपेक्षा वेगळी असल्याचे बोलले जात आहे. सौमेंद्र पाधी हे वेब सीरीज जमतारा (Jhamtara) आणि बुधिया सिंग: बॉर्न टू रन या चित्रपटासाठी ओळखले जातात.
याशिवाय, प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खानने सलमान खानच्या भाचीला ट्रेनिंग दिले आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची आणि अलीजेच्या पदार्पणाची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
सर्व फोटो सौजन्य- alizehagnihotri Instagram