‘आर्ची’चा नादच खुळा...! रिंकू राजगुरूचा खास दिवाळी लुक, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 10:20 AM2021-11-06T10:20:39+5:302021-11-06T10:26:24+5:30

सुरमई अखियों में....!! रिंकूने नुकतंच दिवाळी निमित्ताने खास फोटोशूट केलंय. यात रिंकूचा पारंपरिक लुक पाहायला मिळतोय.

दिवाळीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे पारंपरिक वेशभुषेतील फोटो पाहायला मिळत आहेत. ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुचे फोटोही झक्कास आहेत.

रिंकूने नुकतंच दिवाळी निमित्ताने खास फोटोशूट केलंय. यात रिंकूचा पारंपरिक लुक पाहायला मिळतोय.

या फोटोशूटमधील फोटोंमध्ये रिंकूने सुंदर नऊवार साडी नेसलीय. या पारंपारिक साजात जुन्या पद्धतीने तिने साडी परिधान केली आहे.

नऊवारी, गजरा, दागिने परिधान करून सुंदर पेहराव करण्यात आलाय. या फोटोशूटमधील नव्या सिरीजमधील फोटो तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

याआधीही दिवाळीच्या शुभेच्छा देत तिने साडीतील फोटोत शेअर केले होते.

दिव्यांची आरास आणि रिंकू राजगुरूचा नखरा अशा तिच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं होतं.

सोशल मिडीयावर रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. आणि या चाहत्यांना रिंकूचा हा दिवाळी लुक प्रचंड आवडलाय.