'सैराट' फ्लॉप झाला असता तर...? रिंकू राजगुरुला आलं हसू; म्हणाली, "मला वाटतं तेव्हा मी...."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:54 IST2025-09-12T16:40:01+5:302025-09-12T16:54:45+5:30

रिंकूलाही काम मिळवण्यासाठी इंडस्ट्रीत संघर्ष करावा लागतो का? म्हणाली...

'सैराट' हा मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वात गाजलेला सिनेमा. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमाने ७० कोटींची कमाई केली होती.

या सिनेमातून अभिनेत्री रिंकू राजगुरुला (Rinku Rajguru) 'आर्ची' ही ओळख मिळाली. तर अभिनेता आकाश ठोसर 'परश्या' म्हणून लोकप्रिय झाला.

सैराट मधले सगळेच कलाकार नवखे होते. रिंकू, आकाश आणि इतर सहकलाकारांशी अभिनयाशी धड ओळखही नव्हती. नागराज मंजुळेंनी गावातील मुला मुलींची ऑडिशन घेऊन त्यांची निवड केली होती.

सैराटच्या शूटवेळी रिंकू फक्त सातवीत होती. तर सिनेमा रिलीज झाला तेव्हा ती नववीत होती. आज रिंकू खूप बदलली आहे आणि वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली आहे.

पण जर सैराट फ्लॉप झाला असता तर रिंकू राजगुरुने पुढे काय केलं असतं? 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत असा प्रश्न तिला विचारला असता ती म्हणाली, "परिस्थितीनुसार आपण शिकत जातो. आत्ता काय करणं योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे हे त्या त्या वेळी कळतं."

"मला हे क्षेत्र आवडतंय, मजा येतीये त्यामुळे कदाचित मी प्रयत्न करत राहिले असते. एक्स्प्लोर केलं असतं. कधी कधी सिनेमा आपटतो पण कलाकार चांगलं काम करतो. अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत."

"इंडस्ट्रीत नवीन काम मिळवण्यासाठी सुदैवाने मला अजून तरी संघर्ष करावा लागत नाहीये. माझ्याकडे कामं चालून येतायेत. स्ट्रगल हेच आहे की कामात सातत्य ठेवावं लागतं आणि अगोदर जे केलंय त्यापेक्षा नवीन काय देता येईल याचा विचार करावा लागतो. हा संघर्ष सर्वांनाच आहे. काळानुसार आपल्यालाही बदलावं लागतं."

"तसं तर लहानपणी मला कलेक्टर व्हायचं होतं. कळायला लागल्यावर मला डॉक्टर व्हायचं. पण सातवीत असतानाच मी सिनेमात काम केलं. मला डान्स, कला हे मला लहानपणापासूनच आवडायचं."

"आपल्याला काय करायचंय हे बारावीत किंवा ग्रॅज्युएट झाल्यावर कळतं. पण मला काही कळायच्या आतच सगळं घडलं. त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं मला वाटतं."