'रंग माझा वेगळा'मध्ये मोठा ट्विस्ट, नवीन कार्तिकी आणि दीपिका आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 13:47 IST2023-02-27T13:13:26+5:302023-02-27T13:47:09+5:30

Rang Maza Vegla : रंग माझा वेगळा मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. या मालिकेत दोन नवीन कलाकारांची एन्ट्री झाली आहे.

रंग माझा वेगळा मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे.

मालिकेत पुन्हा एक ट्विस्ट पाहायला मिळाला. दिपावर त्याने पुन्हा संशय घेतला आणि आपल्या मैत्रिणीच्या मृत्यूला दिपाने कार्तिकला जबाबदार ठरवले. आता ही मालिका तब्बल १४ वर्षांचा लीप घेताना दिसणार आहे.

मालिकेत कार्तिक आपली शिक्षा पूर्ण करून जेलच्या बाहेर पडणार आहे. या चौदा वर्षात खूप काही बदल घडून आले आहेत. चिमुरड्या कार्तिकी आणि दीपिका आता मोठ्या झाल्या आहेत. मालिकेतला हा लीप प्रेक्षकांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे.

या मालिकेत दोन नवीन कलाकारांची एन्ट्री झाली आहे. मालिकेने १४ वर्षांचा लीप घेतला असल्याने कार्तिकी आणि दीपिका सुद्धा मोठ्या झालेल्या आहेत.

मालिकेत कार्तिकीच्या भूमिकेत अनुष्का पिंपूटकर झळकणार आहे तर दीपिकाच्या भूमिकेत तनिष्का विशे झळकणार आहे.

तनिष्का ही मालिका, चित्रपट अभिनेत्री आहे. यासोबतच काही नामांकित ब्रॅण्डसाठी आणि टीव्ही जाहिरातींमध्ये तिने मॉडेलिंग केलं आहे.

सुखी माणसाचा सदरा, तू माझा सांगाती, तुझ्या वाचून करमेना, आम्ही दोघी अशा मालिकांमधून तनिष्काने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत यासोबतच डॉ तात्या लहाने, स्लीव्हलेस अशा चित्रपट आणि लघुपटात ती झळकली आहे.

तनिष्काने ‘हॅन्डमेड’ नावाने स्वतःचा बिजनेस सुरू केला आहे. लोकरिपासून विणलेले टॉप, पर्स, पाऊच बनवून ती हे बाजारात विकते. तनिष्काला नृत्याची विशेष आवड असून आपल्या युट्युब चॅनलवर ती नृत्याचे व्हिडीओ शेअर करत असते.

तर कार्तिकीच्या भूमिकेत अनुष्का पिंपूटकर झळकणार आहे. या मालिकेअगोदर अनुष्का कलर्स मराठीवरील आई मायेचं कवच या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसली होती.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच अनुष्काला अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्राचे वेध लागले होते. Belle by Anushka या नावाने तिने मॉडेलिंग क्षेत्रात येऊ घातलेल्या नवख्या कलाकारांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

८ दोन ७५ या चित्रपटात सुद्धा अनुष्का झळकणार आहे. रंग माझा वेगळा मालिकेतून कार्तिकीच्या भूमिकेतून अनुष्का पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.