Rajpal Yadav: ९ कोटींचा चेक बाऊन्स झालेला राजपाल यादव 'इतक्या' कोटींचा मालक, एका सिनेमासाठी किती पैसे घेतो माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:01 IST2026-02-11T15:35:33+5:302026-02-11T16:01:47+5:30
आर्थिक प्रकरणात अडकलेला राजपाल यादवची संपत्ती किती आहे? एका सिनेमासाठी तो किती पैसे घेतो? हे तुम्हाला माहीत आहे का?

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव सध्या एका कठीण आर्थिक आणि कायदेशीर संकटात सापडला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा नाकारल्यानंतर राजपाल यादवला तिहार तुरुंगात शरण (Surrender) जावे लागले.

राजपाल यादवने आत्मसमर्पण करत "माझ्याकडे आता पैसेही नाहीत आणि सोबत मित्रही नाहीत" अशी हतबलता व्यक्त केली होती.

एका सिनेमा बनवण्यासाठी राजपालने पैसे घेतले होते. मात्र या सिनेमात त्याला नुकसान झालं. परिणामी त्याने दिलेला ९ कोटींचा चेक बाऊन्स झाला.

आर्थिक प्रकरणात अडकलेला राजपाल यादवची संपत्ती किती आहे? एका सिनेमासाठी तो किती पैसे घेतो? हे तुम्हाला माहीत आहे का?

राजपाल यादव खासकरून त्याच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखला जातो. भूल भूलैय्यामधील त्याची छोटा पंडितची भूमिका प्रचंड गाजली.

ढोल, चुप चाप के, हंगामा, भागम भाग, फिर हेरा फेरी, खट्टा मिठ्ठा, अपना सपना मनी मनी अशा अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे.

एका सिनेमासाठी राजपाल यादव १ ते २ कोटी रुपये मानधन घेतो. कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियनसाठी त्याने २ कोटी घेतले होते.

तर भूल भूलैय्या २मध्ये गाजलेल्या छोट्या पंडितची भूमिका साकारण्यासाठी त्याने १.२५ कोटी इतकं मानधन घेतलं होतं.

ब्रँड अॅडरॉसमेंटमधून राजपाल यादव दरवर्षी ३५ लाख रुपयांची कमाई करतो.

राजपाल यादव लक्झरियस आयुष्य जगतो. त्याच्याकडे ऑडी, बीएमडब्लू सारख्या कार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याची एकूण प्रॉपर्टी ही जवळपास ५० ते ८० कोटींच्या घरात आहे.

'वेलकम टू द जंगल' या सिनेमात राजपाल यादव दिसणार आहे.

















