हे मुर्ख ट्रोलर्सला कळणार नाही...! टॉपलेस फोटोशूटवरून ट्रोल करणाऱ्यांना रायमा सेनचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 07:00 IST2021-07-03T07:00:00+5:302021-07-03T07:00:02+5:30
रायमा सेन बॉलिवूडमध्ये फार कमाल दाखवू शकली नाही. पण बंगाली सिनेसृष्टीतील मात्र तिचा चांगलाच दबदबा आहे.

रायमा सेन बॉलिवूडमध्ये फार कमाल दाखवू शकली नाही. पण बंगाली सिनेसृष्टीतील मात्र तिचा चांगलाच दबदबा आहे.
बॉलिवूड आणि साऊथमध्ये अपयश पदरी पडल्यावर रायमाने बंगाली चित्रपटांवरच लक्ष केंद्रित केले आणि इथे मात्र तिला अपार यश लाभलं.
रायमा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. तिच्या इन्स्टा अकाऊंटला गेलात की, तिचे बोल्ड, टॉपलेस फोटो लक्ष वेधून घेतात.
या बोल्ड फोटोंमुळे रायमा अनेकदा ट्रोलही होते. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी रायमा टॉपलेस फोटोशूट करते, अशी खिल्ली ट्रोलर्स उडवतात.
आता या ट्रोलर्सला रायमाने उत्तर दिले आहे. एका ताज्या मुलाखतीत तिने टॉपलेस व बोल्ड फोटोशूट करण्यामागचे कारण सांगितले.
लोक काय म्हणतील याची मला अजिबात चिंता नाही. मी इन्स्टाग्रामसाठी फोटोशूट करते आणि ते बिनधास्तपणे शेअर करते. लोक काय म्हणतात याने मला काहीही फरक पडत नाही, असे ती म्हणाली.
बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी मी असे बोल्ड फोटोशूट करतात, असे काही म्हणतात. पण खरे सांगायचे तर मला तसे शूट करायला आवडते. स्वत:ला विविध रुपांमध्ये पाहण्याची मजा काही औरच आहे. ही मजा मुर्ख ट्रोलर्सला कळणार नाही,असे ती म्हणाली.
रायमा सेनने दमन, परिणीता, तीन पत्ती, बॉलिवूड डायरिज अशा अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. अनेक बांगला चित्रपटातही तिने यादगार भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेत्री मुनमुन सेन हिची मुलगी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांची नात अशी ओळख असलेल्या रायमाने १९९९ मध्ये ‘गॉडमदर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला.