'पुन्हा कर्तव्य आहे'मधील साधी भोळी वसुंधरा खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड, फोटोंवरुन हटणार नाही नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 18:17 IST2024-05-10T18:13:30+5:302024-05-10T18:17:33+5:30
अक्षया या मालिकेत वसुंधरा ही भूमिका साकारत आहे. मालिकेत साधी भोळी दिसणारी वसुंधरा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर मुख्य भूमिकेत आहे.
अक्षया या मालिकेत वसुंधरा ही भूमिका साकारत आहे. मालिकेत साधी भोळी दिसणारी वसुंधरा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा अक्षया तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
कधी साडी तर कधी शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट करत अक्षया चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
अक्षयाचा फोटोंमधील बोल्ड अंदाज पाहून चाहतेही घायाळ होतात. तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
अक्षयाचा चाहता वर्गही मोठा आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
अक्षयाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'इश्काचा नादखुळा' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.
याव्यतिरिक्त तिने 'साता जन्माच्या गाठी', 'सरस्वती' या मालिकेतही काम केलं आहे. 'रॉकी' या सिनेमातही ती झळकली होती.