PHOTO's: आदित्य बिर्लांच्या मुलीची बिझनेसमध्ये एन्ट्री; आहे ग्लॅमरस पॉप स्टार गायिका...फोटो पहाल तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 11:17 IST2023-02-01T11:09:23+5:302023-02-01T11:17:26+5:30
Ananya Birla: आदित्य बिर्ला यांनी त्यांची पुढील पिढी बिझनेस सांभाळण्यासाठी उतरविली आहे.

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांची तीन मुले आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. तर टाटा समूहात नोएल टाटा यांची तीन मुले लिया, माया आणि नेव्हिल टाटा यांना टाटा मेडिकल सेंटरच्या बोर्डावर आली आहे. आता आदित्य बिर्ला यांनी त्यांची पुढील पिढी बिझनेस सांभाळण्यासाठी उतरविली आहे.
बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी त्यांच्या वारसांना जबाबदारी सोपविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 1995 मध्ये वडील आदित्य विक्रम बिर्ला यांच्या निधनानंतर केएम बिर्ला यांनी वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी व्यवसायाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती.
समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर व्यवसायाला उभारी दिली. आता ते आपल्या मुलांवर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवत आहेत.
कुमार मंगलम बिर्ला यांनी सोमवारी, 30 जानेवारी 2023 रोजी एक मोठी घोषणा केली. समूहाच्या फॅशन आणि रिटेल व्यवसायात, आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेल लिमिटेडच्या संचालक मंडळावर मुलगी अनन्याश्री बिर्ला आणि मुलगा आर्यमन विक्रम बिर्ला यांची नियुक्ती केली.
दोन्ही भावंडे संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम करतील. बिर्ला समूहाचा व्यवसाय केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. गेल्या 28 वर्षांपासून समूहाचे प्रमुखपद सांभाळत आहेत, या काळात सुमारे 40 कंपन्या ताब्यात घेऊन व्यवसायाचा विस्तार केला आहे.
कुमार मंगलम बिर्ला यांची 28 वर्षांची मुलगी अनन्याश्री बिर्ला ही एक पॉपस्टार गायिका आहे. तसेच तिला तसेच तिला व्यवसायाची समज आहे.
वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी तिने मायक्रो फायनान्स कंपनी सुरू केली होती. 'स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड' असे या कंपनीचे नाव आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोटे कर्ज देण्याचे काम करते.
आर्यमन बिर्ला हा मध्य प्रदेशच्या 2017-18 रणजी संघाचा भाग होता. क्रिकेटची आवड असूनही त्याला व्यवसायाचा पुरेसा अनुभव आहे आणि कंपनी बोर्डात सहभागी होऊन कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्याचे काम करेल.