'फिर हेराफेरी'मधील ही अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीतून गायब, या निर्णयामुळे बर्बाद केलं स्वतःचं करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:14 IST2025-09-25T12:11:29+5:302025-09-25T12:14:07+5:30
"मी माझं करिअर स्वतः बर्बाद केलं.", असं अभिनेत्रीने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

२००० च्या दशकाच्या सुरुवातीस रिमी सेन टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. २००३ मध्ये प्रियदर्शन यांच्या 'हंगामा' या विनोदी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि तिने प्रेक्षकांची मनं जिंकली.
रिमीचे शानदार स्क्रीन प्रेझेन्स आणि उत्कृष्ट कॉमिक टायमिंगमुळे त्यांना लवकरच 'धूम', 'गोलमाल', 'फिर हेराफेरी' आणि 'क्योंकि' सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम मिळालं. काही वर्षांतच रिमी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री झाली.
शुभमित्रा सेन असं रिमी सेनचं खरं नाव आहे. तिचा जन्म २१ सप्टेंबर १९८१ रोजी कोलकाता येथे झाला. तिने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंग आणि जाहिरात क्षेत्रात आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती.
सतत हिट चित्रपट आणि टॉप कलाकारांसोबतच्या जोड्यांमुळे रिमी यशाच्या शिखरावर होत्या. पण या ग्लॅमरमागे काही तणावही होता.
यशानंतरही रिमी स्वतःला एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये अडकल्याचं समजत होती, ज्यात बहुतेक सुंदर नायिका या प्रतिमेपलीकडे काही खास नव्हतं. चांगल्या संधींची कमतरता असल्याने निराश होऊन तिचा करिअर ग्राफ झपाट्याने वाढत असतानाही तिने अभिनयातून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
रिमीने एका मुलाखतीत स्पष्टपणे मान्य केलं होतं की, तिचा हा ऱ्हास तिने स्वतःच केला होता. ती म्हणाली की, "मी माझं करिअर स्वतः बर्बाद केलं."
तिने हे देखील मान्य केलं की, त्यांनी अशा ऑफर्स नाकारल्या ज्या तिच्या अपेक्षांवर खरं उतरत नव्हत्या, जरी ती आकर्षक असली तरी. तिच्या स्वतःच्या वक्तव्यानुसार, तिने बॉलिवूडच्या 'किसिंग सीन' सारख्या मागण्यांसमोर झुकण्यास नकार दिला आणि तडजोड करण्याऐवजी माघार घेणं पसंत केलं.
२०१५ मध्ये 'बिग बॉस ९' मध्ये एक स्पर्धक म्हणून रिमी काही काळासाठी पुन्हा दिसली, पण त्यानंतर ती बहुतेक वेळा लाइमलाइटपासून दूरच राहिली.
आज रिमी सेन यांना २००० च्या दशकातील बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावंत कलाकारांपैकी एक म्हणून आठवलं जातं. एक अशी प्रतिभा जिने स्टारडमऐवजी शांततेला निवडलं.