'National Handloom Day' निमित्त दिया मिर्झाने शेअर केले खास फोटो; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 17:11 IST2024-08-07T17:01:18+5:302024-08-07T17:11:56+5:30

दिया मिर्झा ही बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

'रहना है तेरे दिल मैं' या चित्रपटातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.

दिया मिर्झाने 'लगे रहों मुन्ना भाई', 'शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला' तसेच 'संजू' यांसारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

अभिनेत्री दिया मिर्झा सध्या चित्रपटांपासून तशी दूरच आहे. पण सोशल मिडियावर ती बऱ्याचदा सक्रिय असते.

नुकतेच तिने 'National Handloom Day: 2024' निमित्त काही खास फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.

दियाने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये भारतातील हातामाग उद्योगामध्ये असलेली वैविध्यता पाहायला मिळते.

या फोटोंमधून भारताची संस्कृती, लोककला याची माहिती मिळते. प्रत्येक फोटोमध्ये दियाने हातापासून तयार केलेल्या (हातमागाच्या) वस्तुंसोबत फोटो क्लिक केले आहेत.

एका फोटोमध्ये अभिनेत्रीने हॅडलूम सिल्क साडी नेसली आहे तर काही फोटोंमध्ये ती कुंभाराप्रमाणे हाताने मातीचे मडके घडवताना दिसते आहे.

दिया मिर्झाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.