न्युझीलंडची ही पॉप सिंगर लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 17:49 IST2020-03-02T17:33:46+5:302020-03-02T17:49:13+5:30

न्युझीलंडची पॉप सिंगर 'शर्ली सेतिया' हिचा जन्म भारतात झाला आहे. लहान असतानाच ती आपल्या कुटुंबासोबत न्युझीलंडला स्थायिक झाली.
शर्ली सेतिया मुळची न्युझिलंडची गायिका आहे.
शर्ली पॉप गाण्यांसाठी ओळखली जाते.
शर्लीने टी-सीरीजद्वारे आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि ती त्या स्पर्धेची विजेती ठरली.
शर्लीने अनेक पुरस्कारही पटकावले आहेत.
शर्ली युट्युबवर लोकप्रिय असून तिचे कोट्यावधी सब्सक्रायबर आहे.
शर्लीला 'पायजामा पॉपस्टर' या नावाने देखील ओळखले जाते.
सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यापूर्वी शर्ली एक आरजे होती.
शर्लीचा 'शो टाइम विद शर्ली' हा खास शो रेडिओवर प्रसरित व्हायचा.
इतकेच नव्हे तर शर्लीन 'निक्कमा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
'निक्कमा' या चित्रपटात शर्ली अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा 'अभिमन्यु दसानी' सोबत दिसणार आहे.
'निकम्मा' हा चित्रपट शब्बीर खान यांनी दिगर्शित केला असून २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.