Miss World 2025: कोण आहे मिस वर्ल्ड ओपल सुचाता? १६व्या वर्षी ब्रेस्टमध्ये गाठ सापडली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 10:29 IST2025-06-01T09:45:41+5:302025-06-01T10:29:12+5:30

Who is Opal Suchata, Miss World 2025: 'मिस वर्ल्ड २०२५'चा महाअंतिम सोहळा भारतातील हैदराबाद येथे ३१ मे रोजी पार पडला. थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिने 'मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकला.

Miss World 2025: 'मिस वर्ल्ड २०२५'चा महाअंतिम सोहळा भारतातील हैदराबाद येथे ३१ मे रोजी पार पडला. थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिने 'मिस वर्ल्ड २०२५'चा मुकुट जिंकला.

मिस वर्ल्डचा खिताब नावावर करत ओपल सुचाता हिने इतिहास रचला आहे. हा मुकुट चढवणारी ती पहिली थाई महिला आहे.

ओपल सुचाताचा जन्म २० सप्टेंबर २००३ रोजी थायलंडमधील फुकेत येथे झाला. ती थाई मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धेची विजेतीदेखील आहे.

सायकोलॉजी आणि अँथ्रोपोलॉजी यामध्ये तिला इंटरेस्ट आहे. देशाची ब्रँड अम्बेसिडर व्हायचं तिचं स्वप्न आहे.

१६व्या वर्षी ओपल सुचाताच्या स्तनामध्ये एक गाठ आढळून आली होती. त्यानंतर तिची सर्जरी करण्यात आली.

तेव्हापासून ब्रेस्ट कॅन्सर संदर्भात जनजागृती करण्यासाठी Opal For Her हे विशेष कॅम्पेन ती चालवते.

ओपल सुचाता ही प्राणीप्रेमी आहे. तिला प्राण्यांची आवड आहे. तिच्याकडे १६ मांजरी आणि ४ कुत्रे आहेत.