Urfi Javed प्रमाणेच तिच्या चारही बहिणी आहेत हॉट; आईदेखील दिसते प्रचंड ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 15:46 IST2022-02-03T15:38:14+5:302022-02-03T15:46:18+5:30

Urfi javed: उर्फीला एकूण चार बहिणी असून त्यादेखील तिच्यासारख्याच बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत. इतकंच नाही तर तिची आईदेखील प्रचंड सुंदर दिसते.

चित्रविचित्र फॅशनसेन्समुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. अनेकदा बोल्ड फोटोशूट आणि कपड्यांमुळे उर्फी चर्चेत येण्यासोबतच ट्रोलही होत असते.

मध्यंतरी उर्फी जावेद प्रकाशझोतात आल्यानंतर ती गीतकार जावेद अख्तर यांची नात असल्याची चर्चा रंगली होती. परंतु, उर्फीचा जावेद यांच्या कुटुंबाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. तेव्हापासून उर्फीची खरी फॅमिली कोणती असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

उर्फीला एकूण चार बहिणी असून त्यादेखील तिच्यासारख्याच बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत. इतकंच नाही तर तिची आईदेखील प्रचंड सुंदर दिसते.

उर्फीच्या मोठ्या बहिणीचं नाव उरुसा जावेद आहे. उरुसा सोशल मीडियावर सक्रीय असून ती एक Entrepreneur आहे.

उरुसा डिजिटल मार्किटिंग क्षेत्रात काम करते.

अस्फी ही उर्फीची सगळ्यात धाकटी बहीण आहे. अस्फीदेखील एक ब्लॉगर आणि इन्स्टा इन्फ्लुएंसर आहे.

उर्फीपेक्षा लहान असलेल्या बहिणीचं नाव डॉली जावेद आहे. डॉली एक ब्लॉगर आहे. डॉलीसुद्धा उर्फीप्रमाणे बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत असते.

उर्फीला चार बहिणींव्यतिरिक्त एक भाऊदेखील आहे. त्याचं नाव सलीम आहे. विशेष म्हणजे सलीम त्याच्या आईच्या प्रचंड क्लोज आहे.

उर्फीची आईदेखील आपल्या मुलींप्रमाणेच बोल्ड आणि बिंधास्त आहे. त्यांचं नाव जाकिया सुल्ताना असं आहे.