माझी तुझी रेशीमगाठ: यशच्या प्रेमात पडल्यानंतर बदलला नेहाचा लूक; फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:59 IST2022-03-02T13:55:38+5:302022-03-02T13:59:56+5:30

Mazi tuzi reshimghath: या मालिकेत दररोज रंजकदार वळण येत असल्यामुळे ही मालिका पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढत आहे. त्यातच आता नेहा आणि यशची लव्हस्टोरीदेखील सुरु झाली आहे.

छोट्या पडद्यावर तुफान यशस्वी ठरलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. अल्पावधीत ही मालिका लोकप्रिय झाली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून यशवरचं प्रेम व्यक्त न करणाऱ्या नेहाने अखेर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

विशेष म्हणजे यशसमोर प्रेमाची कबुली दिल्यानंतर नेहाच्या लूकमध्ये बदल होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अलिकडेच नेहाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये नेहाचा लूक पूर्णपणे चेंज झाल्याचं दिसून येत आहे.

नेहाची हेअर स्टाइल आणि तिचा फॅशनसेन्स बदलल्याचं दिसून येत आहे.

नेहाच्या या बदललेल्या लूकला नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळत आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिचे फोटो शेअर करत असते.